Margao Dainik Gomantak
गोवा

Margao News : ख्रिस्‍ती मतांचे ध्रुवीकरण झाल्‍याचा आरोप पूर्णपणे चुकीचा : क्‍लिओफात कुतिन्‍हो

Margao News : हिंदू मतदार अधिक असूनही दक्षिणेत अल्पसंख्याक खासदारांचाच दबदबा

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

मडगाव, दक्षिण गोव्‍यात भाजपचा पराभव होण्‍यामागे ख्रिस्‍ती मतांचे ध्रुवीकरण झाले असल्‍याचा आरोप होत असतानाच ज्‍येष्‍ठ राजकीय विश्‍‍लेषक ॲड. क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो यांनी तो सपशेल चुकीचा असल्‍याचे म्‍हटले आहे.

भाजपच्‍या पराजयासाठी चर्चचा संदेश कारणीभूत आहे असे म्‍हणणेही योग्‍य नाही, अशी प्रतिक्रिया गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या लोकप्रिय अशा ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना त्‍यांनी व्‍यक्त केली.

दक्षिण गोव्‍यात ख्रिस्‍ती मतदारांपेक्षा हिंदू मतदारच अधिक आहेत. तरीसुद्धा फक्‍त दोन अपवाद वगळता अन्‍य सर्व लोकसभा निवडणुकांमध्‍ये दक्षिण गोव्‍यातून अल्‍पसंख्‍याकांचे प्रतिनिधीत्‍व करणारा ख्रिस्‍ती खासदारच निवडून आला आहे याकडे कुणी दुर्लक्ष करता कामा नये, असे कुतिन्‍हो म्‍हणाले. गोमन्‍तकचे ब्यूरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली असून ती गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या यू-ट्यूब, फेसबुक व इन्‍स्‍टाग्रामवर उपलब्‍ध आहे.

ॲड. कुतिन्‍हो म्‍हणाले, दक्षिण गोव्‍यातून निवडून येणारा खासदार ख्रिस्‍ती असायला अन्‍य मतदारांची हरकत नाही हेच आजवरच्‍या निकालाने दाखवून दिले आहे. दक्षिण गोव्‍यातील बहुसंख्‍य समाजातील मतदारांनीही हे मान्‍य केले आहे. यावेळी मुस्‍लिम समाज काँग्रेसच्‍या बाजूने येण्‍याचे कारण म्‍हणजे, भाजपने आपल्‍या वेगवेगळ्‍या करण्‍यांनी त्‍यांना दुसरा मार्गच ठेवला नाही.

महाराष्‍ट्रातील मुस्‍लिम मतदारांना आता उद्धव ठाकरे जवळचे वाटू लागले आहेत. यावरूनच भाजपची रणनीती या समाजाला मान्‍य नाही हे स्‍पष्‍ट होते. मडगावातही या एकाच कारणामुळे मुस्‍लिम मतदारांनी दिगंबर कामत यांना साथ न देता ‘इंडिया’ आघाडीचा ‘हात’ पकडला. भाजप उमेदवाराला यावेळी अपेक्षेपेक्षा कमी मते पडण्‍यामागे भाजपचेच निष्‍ठावंत कार्यकर्ते कारणीभूत असू शकतात.

चर्चच्‍या संदेशाला आताच आक्षेप का?

चर्चने संदेश दिल्‍यामुळेच ख्रिस्‍ती मतदारांनी भाजपला मतदान केले नाही असा आरोप भाजप नेत्‍यांकडून केला जातोय. यावर ॲड. कुतिन्‍हो यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्‍हणाले की, चर्च प्रत्‍येक निवडणुकीवेळी असे संदेश देते. त्‍यात ‘लोकशाहीची मूल्‍ये जपा’, ‘पर्यावरणाचे रक्षण करा’ असे सांगितले जाते. २०१२ साली चर्चच्‍या अशा संदेशामुळेच मनोहर पर्रीकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली भाजप सरकार निवडून आले होते याचा विसर आत्ताच्या भाजप नेत्‍यांना पडला आहे का? असा सवाल त्‍यांनी केला.

‘संविधानविरोधी’ ठरविण्‍याचा प्रयत्‍न अंगलट

‘भारताचे संविधान गोव्‍याच्‍या नागरिकांवर थोपविले गेले’ अशा प्रकारचे वक्‍तव्‍य केल्‍यामुळे काँग्रेसचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांना भाजपच्‍या काही नेत्‍यांनी ‘संविधानविरोधी’ ठरविण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यामुळे कॅप्‍टनच्‍या विरोधात वातावरण तयार होणार अशी शक्‍यता भाजप नेत्‍यांना वाटत होती.

मात्र त्‍याचा परिणाम उलटा झाला. अल्पसंख्याक मतदारांनी भाजपचा हा प्रकार म्‍हणजे कॅप्‍टनना विनाकारण टार्गेट करण्‍याचा प्रयत्‍न असे मानून घेत भाजपला धडा शिकविण्‍यासाठी आपला संपूर्ण पाठिंबा कॅप्‍टनना देण्‍याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना 12 कोटी 70 लाख रुपये मंजूर

SCROLL FOR NEXT