Margao
Margao  Dainik Gomantak
गोवा

Margao News : दोन गटांत वाद, रुमडामळमध्ये तणाव; पोलिसांत तक्रारी

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

मडगाव, या ना त्या कारणाने नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या रुमडामळ - दवर्ली या भागात आज दोन गटांत झालेल्या वादावादीमुळे पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी पोलिस स्थानकात दिल्या आहेत.

एका गटाने विरोधी गटातील तीन युवकांकडून एका महिलेची मस्करी केल्याची तक्रार पोलिसात दिली असून दुसऱ्या गटाने गावाबाहेरील गुंड आणून आपल्याला विनाकारण मारहाण केल्याचा दावा केला आहे. ितघांना मारहाण करणाऱ्या संशयितांना अटक करा, अशी मागणी करून रुमडामळ येथील स्थानिकांनी आज सायंकाळी येथील पोलिस चौकीसमोर गर्दी केली होती.

यातील एक गट दवर्लीचे माजी सरपंच आणि आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सिद्धेश भगत यांचा असून दुसरा गट स्थानिक युवकांचा होता.

आज सकाळी ईदनिमित्त आपण आपल्या पत्नीसह लोकांच्या गाठीभेटी घेण्यास चाललेलो असताना या युवकांनी आपल्या पत्नीची मस्करी केली असा आरोप भगत यांनी केला, पण स्थानिक युवकांनी हा आरोप नाकारला व भगत यांनी आमच्यावर आरोप करून बाहेरील गुंडांकडून मारहाण केली असा आरोप केला.

पोलिस चौकीवर स्थानिकांची गर्दी

सायंकाळी त्या मारहाण करणाऱ्या गुंडांना अटक करा, अशी मागणी करून स्थानिकांचा गट रुमडामळ पोलिस चौकीवर जमा झाला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी मडगावचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई हे स्वतः पोलिस चौकीवर दाखल झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition Case: राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली, युरी आलेमाव यांचा घणाघात

Betim Accident: बेती-वेरे येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच अंत

T20 World Cup: शानदार विजयानंतर हिट मॅनचं विजयी सेलिब्रेशन, मैदानात गाढला 'तिरंगा'; हार्दिकला दिली जादू की झप्पी

DGP Jaspal Singh : डीजीपींची खुर्ची अस्थिर, बिश्णोईंकडे देणार ताबा

Goa Weather Update : राज्यात पाऊस @ ३५ इंच; सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक

SCROLL FOR NEXT