Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa Government: एसटी समाजाचा 5 मार्चला विधानसभेवर मोर्चा : फर्नांडिस

Goa Government: राज्य सरकारने नेहमीच गृहीत धरल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

Goa Government: ‘मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर एसटी ऑफ गोवा’तर्फे 5 मार्च रोजी विधानसभेवर भव्य मोर्चा नेण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मिशनचे अध्यक्ष ॲड. जॉन फर्नांडिस यांनी सांगितले की, सरकार एसटी समाजाला गृहीत धरीत आहे.

2003 साली एसटी समाज म्हणून दर्जा मिळाला. पण त्यानंतर भारताच्या घटनेत जे हक्क आहेत, ते देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे म्हणून 21 जुलै 2023 रोजी आमदार गणेश गावकर यांनी खासगी ठराव मांडला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ नवी दिल्लीत नेऊन केंद्रीय नेत्यांच्या कानावर यासंदर्भात चर्चा करण्याचे आश्र्वासन दिले होते. सहा महिने उलटले, तरी सरकार काहीच हालचाल करीत नाही.

30 डिसेंबर 2023 रोजी आम्ही सभापतींना आवाहन केले होते की, त्यांनी हा ठराव मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा त्यांच्या घरावर मोर्चा नेण्यात येईल. मिशनचे प्रवक्ते गोविंद शिरोडकर यानी सांगितले की, सरकारने परिसीमन समिती निवडावी आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी या विषयावर तोडगा काढावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT