Marcel Meat Market: Dainik Gomantak
गोवा

Marcel: माशेल मांस मार्केटवर जीवघेणं छप्पर! ग्राहक- विक्रेत्यांची जीवघेणी कसरत; तातडीने दुरुस्तीची मागणी

Marcel Meat Market: माशेल बाजारातील मांस मार्केटच्या शेडचे छप्पर पूर्णपणे निकामी झाले असून ते कोसळण्याच्या स्थितीत आहे. या ठिकाणी दररोज मांस विक्री होते, ग्राहकांची मोठी गर्दी असते.

Sameer Panditrao

खांडोळा : माशेल बाजारातील मांस मार्केटच्या शेडचे छप्पर पूर्णपणे निकामी झाले असून ते कोसळण्याच्या स्थितीत आहे. या ठिकाणी दररोज मांस विक्री होते, ग्राहकांची मोठी गर्दी असते. अर्धवट खचलेल्या छप्पराखाली ग्राहक आणि विक्रेते रोजच जीव मुठीत धरून व्यवसाय आणि खरेदी करत आहेत. वादळी वारा किंवा पावसाळ्यात कधीही दुर्घटना घडू शकते, असा गंभीर धोका कायम आहे.

स्थानिक पंचायतीने या धोकादायक छप्पराची तातडीने पाहणी करून ते हटवून नवे, मजबूत छप्पर उभारावे, अशी जोरदार मागणी ग्राहक व विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. “कधीही हे छप्पर कोसळले तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा घटनेला पंचायतीला जबाबदार धरावे लागेल,” असे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

या ठिकाणी शेडच्या एका बाजूला अनेकवेळा दुचाकी पार्किंगही होते. त्यामुळे छप्पर कोसळले तर वाहनांचेही मोठे नुकसान होऊ शकते. मांस विक्रेते नाईलाजाने या धोकादायक छप्पराखालीच व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी एका वयस्क महिलेला येथे भाजी विक्री करताना त्रास सहन करावा लागला. पावविक्रेतेही येथे उभे राहतात. ग्राहकांची मोठी रेलचेल असताना जीवघेणी परिस्थिती अधिक धोकादायक ठरते.

सुरक्षेकडे दुर्लक्ष

गेल्या महिन्यात पंचायत मंडळाने दोन वेळा उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखल केला, त्यानंतर दोन वेळा निवडही झाली. यात बराच वेळ वाया गेला. सत्तेसाठी वेळ काढणाऱ्या पंच मंडळाने स्थानिकांच्या जीविताच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.“संगीत खुर्चीचा खेळ बंद करून स्वच्छ, सुंदर माशेल पंचक्रोशीसाठी काम करावे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT