Marathi theatre contributed Gomantakiyas Dainik Gomantak
गोवा

Goa News: मराठी रंगभूमी समृद्ध करण्‍यात गोमंतकीयांचेही योगदान

Goa News: 1843 साली महाराष्‍ट्रातील सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला.

दैनिक गोमन्तक

Goa News: लखलखीत प्रकाशात झगमगणारे रंगमंच...लाल मखमली पडदा...संगीताचा मंद स्वर...नेपथ्य...तिसरी घंटा आणि समोर विराजमान झालेले नाट्यरसिक मायबाप प्रेक्षक, असे दृष्ट्य डोळ्यासमोर उभे राहताच कोणत्याही रंगकर्मीच्या अंगावर काटा उभा राहिला नाही तर नवलच. मागील काही काळात रंगभूमीवर पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, मनोरंजनपर, रहस्यमय असे वेगवेगळे विषय हाताळले जाऊ लागले आहेत. गोव्याने देखील अनेक कलाकार दिले. गोवा हे मराठी नाटकांचा एक केंद्रबिंदू आहे असे संबोधल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

1843 साली महाराष्‍ट्रातील सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 साली ‘सीता स्वयंवर’ नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. त्‍यानंतर बरोबर 100 वर्षांनी म्‍हणजे 1843 साली या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन रंगभूमी दिवस साजरा केला. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात गोमंतकीयांचे योगदान मोठे आहे. गोव्यातील मराठी नाट्यपरंपरेची सद्य:स्थिती याबाबत नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञांची जाणून घेण्‍याचा केलेला हा प्रयत्‍न. गोमंतकीय रंगभूमी विकसित झाली असून आता ती गोव्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. अनेक स्पर्धामध्ये गोमंतकीय कलाकारांना प्रावीण्य प्राप्त होत आहे. विविध प्रशिक्षित कलाकारांनी नाट्यकलेचे प्रशिक्षण घेतले आहे. जागतिक रंगभूमीवरील सर्व प्रवाह ते गोव्याच्या रंगभूमीवर आणू पाहताहेत. त्यामुळे या रंगभूमीला उत्तम भवितव्य आहे.

- डॉ. अजय वैद्य,प्रसिद्ध नाट्य अभ्यासक

गोव्याच्या नाट्यक्षेत्राला मध्यंतरी एक मरगळ आली होती, मात्र ती झुगारून रंगभूमीने पुन्हा नव्याने उभारी घेतली आहे. कला व संस्कृती संचालनालयाच्या वतीने नाटकांना नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नाट्यमहोत्सवांना मदत केली आहे. म्‍हणूनच गोव्‍याच्‍या गावागावांत होणाऱ्या मराठी नाटकांना उदंड प्रतिसाद मिळतोय. मीसुद्धा एक कलाकार आहे. माझ्‍याकडून गोमंतकीय कलाकारांना या दिवसाच्‍या हार्दिक शुभेच्‍छा.

- गोविंद गावडे, कला व संस्‍कृतीमंत्री

गोमंतकीय मराठी रंगभूमीवर काही प्रमाणात नावीन्य येणे गरजेचे आहे. जागतिक रंगभूमीवर नवनवीन प्रयोग होत असून त्‍या पद्धतीने गोव्यात देखील नाट्यप्रयोग होणे अपेक्षित आहे. संगीत नाट्यप्रयोगाला वेळ अधिक लागतो. आता प्रेक्षक तेवढा वेळ देऊ शकत नाहीत. तसेच गोव्यात बालरंगभूमी विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे. बालरंगभूमीद्वारेच उत्तम नट रंगभूमीला प्राप्त होत असतात.

- दीपक आमोणकर, नाट्यदिग्‍दर्शक

गोव्‍यात वर्षभरात साडेतीन हजारांहून अधिक मराठी नाटकांचे प्रयोग सादर केले जातात. पूर्वी राज्यात नाट्यकलाकारांना प्रोत्साहन न मिळाल्‍याने त्यांना महाराष्ट्रात जावे लागले. तेथे देखील त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात गोमंतकीयांचे मोठे योगदान आहे. यावरून आमची नाट्यपंरपरा किती समृद्ध आहे हे स्‍पष्‍ट होते. भविष्यातही मराठी रंगभूमीवर उत्तमोत्तम कलाकारांना यश प्राप्त होईल यात शंका नाही.

- देविदास आमोणकर, नाट्यरंगकर्मी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT