

Smriti Mandhana wedding postponed: भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाहसोहळा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे.
२३ नोव्हेंबर रोजी विवाह होणार होता, मात्र स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने तो पुढे ढकलण्यात आला. मात्र, त्यानंतर स्मृतीने लग्नाशी संबंधित आपले सर्व जुने इन्स्टाग्राम पोस्ट अचानक डिलीट केल्याने 'चीटिंग'च्या जोरदार अफवा उठल्या आहेत. या अफवांमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
वडिलांना हार्ट अटॅकची लक्षणे दिसल्याने त्यांना सर्वहित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुसऱ्याच दिवशी, स्मृतीचा होणारा पती पलाश मुच्छल यालाही अचानक आरोग्याच्या कारणामुळे सांगलीतील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या गोंधळात, ज्या गोष्टीने लोकांचे सर्वाधिक लक्ष वेधले, ती म्हणजे स्मृतीने अत्यंत शांतपणे आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साखरपुड्याची घोषणा आणि प्रपोजल व्हिडिओसह लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. या टाइमिंगमुळे ऑनलाइन जगतात लगेचच तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
या सर्व घडामोडींमध्ये, 'मॅरी डी कोस्टा' नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने पलाश मुच्छलसोबतच्या कथित चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करून वादाला तोंड फोडले आहे. मे २०२५ मधील या मेसेजमध्ये पलाश कथितरित्या मॅरीला 'स्विमिंगसाठी' विचारत असल्याचे दिसत आहे.
मॅरीने जेव्हा पलाशच्या रिलेशनशिप स्टेटस आणि प्रेमाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पलाशने थेट उत्तर न देता तो टाळला आणि केवळ भेटण्यासाठी आग्रह धरला. ज्या अकाउंटवरून हे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले होते, ते नंतर डिएक्टिव्हेट करण्यात आले असले तरी, हे स्क्रीनशॉट वेगाने व्हायरल होत आहेत आणि 'चीटिंग'च्या अफवांना बळ देत आहेत.
पलाशची बहीण गायिका पलक मुच्छल हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्नाचे सोहळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली होती. "स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीमुळे स्मृती आणि पलाशची लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.
या संवेदनशील वेळी कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी आपणा सर्वांना विनंती आहे." महत्त्वाची बाब म्हणजे, स्मृती किंवा पलाश या दोघांपैकी कोणीही आपल्या अकाउंटवर लग्नाबद्दल कोणतीही पोस्ट शेअर केलेली नव्हती, मात्र स्मृतीने सर्व जुने पोस्ट डिलीट केल्याने संशय अधिक वाढला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.