Marathi state drama competition Dainik Gomantak
गोवा

गोव्यात मराठी नाट्यस्पर्धेचा बिगुल! 18 नाटकांची मेजवानी; वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा..

State drama competition: मराठी ‘अ’ गट नाट्यस्पर्धा आजपासून कांपाल येथील संकुलात होत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर ‘अ’ गट स्पर्धा पुन्हा कांपाल येथील दीनानाथ नाट्यगृहात होत असल्यामुळे कलाकारांत नवचैतन्य आल्याचे दिसून येते.

गोमन्तक डिजिटल टीम

विकास कांदोळकर

यंदाची मराठी ‘अ’ गट नाट्यस्पर्धा आजपासून कला अकादमीच्या कांपाल येथील संकुलात होत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर ‘अ’ गट स्पर्धा पुन्हा कांपाल येथील दीनानाथ नाट्यगृहात होत असल्यामुळे कलाकारांत नवचैतन्य आल्याचे दिसून येते.

पन्नास वर्षांपूर्वी उत्सवी रंगभूमीवर कार्य करणाऱ्या आमच्या सारख्या रंगकर्मींना कला अकादमी नाट्यस्पर्धेने बरेच काही दिले. नवीन नाटके, प्रायोगिकता, उचित नाट्यतंत्र, यांचे भान कला अकादमी स्पर्धेने दिल्यामुळे, त्या अडचणीच्या काळातही परगावी जाऊन नाट्यशास्त्र शिकता आले आणि आधुनिक रंगभूमीची थोडीफार सेवा करता आली. संधी लाभल्यास कला अकादमी नाट्यस्पर्धेचा संपूर्ण तपशील आणि माहोल गोव्यातील नवीन पिढीसमोर मांडू.

मध्यंतरीच्या काळात स्पर्धेसाठी साखळी रवींद्र भवनने दिलेल्या सहकाऱ्याबद्दल विशेष आभार. गोवा कला अकादमीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध नाट्यस्पर्धांमुळे गोमंतकीय मराठी रंगभूमीला अनेक नवीन नाटककार, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ मिळवून दिले. स्पर्धेने गोव्यातील गावागावांतील उत्सवी रंगमंचावरील नाट्यवेड्यांना रंगकर्मी बनवले.

‘स्पॉट, डीमर, ब्लॉकिंग, प्रोफाइल, अपस्टेज, डाउनस्टेज, राइट स्टेज, लेफ्ट स्टेज, सायक्लोरामा’ सारखे शब्द ग्रामीण उत्सवी रंगभूमीवर सुद्धा ऐकायला येऊ लागले. काय केले म्हणजे आपले नाटक इतरांपेक्षा वेगळेपणाने सादर करता येईल, याचा शोध घेण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे स्पर्धेतील नाटकांचा दर्जा उंचावण्यास मदत झाली. तसेच स्पर्धेतील सहभागामुळे, नाटकाचे शास्त्र-शुद्ध शिक्षण घेण्यास बरीच मुले पुढे सरसावल्याचे दिसून येते.

प्रारंभीच्या काळात नाटकासाठी अभिनय करणाऱ्या मुली भेटणे कठीण होते पण नंतरच्या काळात अभिनय क्षमतेवरून मुलींची निवड होऊ लागली. तसेच कला अकादमी नाट्यस्पर्धेने बरीच लग्ने जमविण्याचे ‘सामाजिक’ कार्यसुद्धा बजावले आहे.

‘अ’ गट स्पर्धेसाठी संपूर्ण गोव्यात चैतन्याचे वातावरण असताना कला अकादमीच्या कार्यालयात गेलो असता तेथील वातावरण थोडेफार मरगळल्याचे भासले. डिसेंबर महिन्याचा शेवट असल्यामुळे अधिकारी सुट्ट्या संपवण्याच्या मार्गावर असावेत. कदाचित सरकारने कला अकादमीचे कार्यालय आकर्षित, चकचकणाऱ्या कॅसिनोंच्या कार्यालयांच्या मध्ये आणल्यामुळे ते निस्तेज भासले असेल तर नाही ना? काहीही असो, कॅसिनोने आपल्या मोहजालातून कला अकादमीला आणि इतर अधिकारी वर्गाला आकर्षित करण्यापूर्वी आणि गोमंतकीय कलेत भलतेच मिश्रण होण्यापूर्वी कला अकादमीने आपले कार्यालय कांपाल येथील आपल्या पवित्र वास्तूत आणणे उचित ठरेल.

कला अकादमीच्या कार्यालयातून स्पर्धेच्या तयारीच्या तांत्रिक अंगांची नीट माहिती न मिळाल्यामुळे थेट कांपाल येथील स्पर्धेच्या जागेलाच भेट देण्याचे ठरविले! गोवा कला अकादमीची वास्तु तथाकथित दुरुस्तीसाठी कांही वर्षे सर्वच कार्यक्रमांसाठी बंद ठेवण्यात आली. प्रकल्प सुरू झाल्यानंतर अफाट खर्च करूनही कला अकादमीची प्रकाशयोजना व्यवस्था अ गट नाट्य स्पर्धेसाठी कुचकामी ठरली.

अपेक्षित सुधारीत प्रकाश योजना व्यवस्था आर्थिक आणि तांत्रिक कारणांमुळे स्पर्धे अगोदर कार्यरत करणे शक्य नव्हते. गोव्यातील नाट्यगृहांच्या लहानमोठ्या दुरुस्तीच्या खर्चासाठी नाटकाशी सुतराम संबंध नसलेल्या ‘वरिष्ठांची’ परवानगी घ्यावी लागते आणि ती घेण्याची प्रक्रिया क्लिष्ट व वेळखाऊ आहे हे कित्येकवेळा निदर्शनात आले आहे.

सांस्कृतिक समज असलेले किंवा नाट्यवेडे थिएटर मॅनेजर असल्यास तात्पुरता का होईना, पण होत असलेल्या गैरसोयीतून नक्कीच मार्ग काढला जातो. याची प्रचिती काल कला अकादमीला भेट देताना आली. थिएटर मॅनेजर्स आणि त्यांच्या खालील इतर कर्मचारी वर्ग अक्षरशः ‘युध्द पातळीवर’ काम करून इथून तिथून गोळा केलेली प्रकाश उपकरणे लावताना दिसत होते. त्यांनी केलेली तात्पुरती प्रकाश योजनेची व्यवस्था नक्कीच नाट्यस्पर्धेतील सर्वच नाटकांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.

Marathi state drama competition Goa

यासाठी सगळ्यांच ‘अ’ गट नाट्यस्पर्धकांनी त्यांचे विशेष आभार मानले पाहिजेत. तसेच स्पर्धेदरम्यान या व्यवस्थेचा काळजीपूर्वक वापर करावा. प्रकाश योजनाकारांनी लावलेल्या उपकरणांचा आराखडा आपल्या प्रयोगापूर्वीच कला अकादमीतून संबंधित व्यक्तीकडून घेऊन जावा व कागदावर आपल्या नाटकाच्या प्रकाशयोजनेचे नियोजन करूनच संबंधित दिवशी आपापल्या नाटकांसाठी प्रकाश योजना करावी. स्पर्धेत यंदा अठरा नाटकांचा सामावेश आहे. त्यातील काहीं रूपांतरित प्रसिद्ध आणि आव्हानात्मक विदेशी नाटके आहेत. रूपांतरकारांनी ‘गूगल ट्रान्सलेट’, ‘CHATGPT’ सारखी संगणक प्रणाली वापरली नसल्याची आशा बाळगूया. कारण बऱ्याचवेळी आपण संगणकाला ‘सफरचंदे’ द्यायला सांगितली तरी आपल्याला त्याच्याकडून ‘काजऱ्याची फळे’ भेटू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT