Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Pernem: 'आता नाही तर कधीच नाही'! पेडणे प्रखंड मेळाव्यात मराठीप्रेमींचा निर्धार; राजकीय शक्ती वाढवण्याचे वेलिंगकरांचे आवाहन

Subhash Velingkar: मराठी राजभाषा व्हायची असेल तर मराठीची ‘व्होट बँक’ निर्माण करून मराठीच्या बाजूने राजकीय शक्ती वाढवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केले.

Sameer Panditrao

पेडणे: मराठी राजभाषा व्हायची असेल तर मराठीची ‘व्होट बँक’ निर्माण करून मराठीच्या बाजूने राजकीय शक्ती वाढवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केले. मराठी राजभाषा निर्धार समिती गोवा तर्फे आयोजित पेडणे प्रखंड मेळाव्यात ते बोलत होते.

पेडणे येथील भगवती हायस्कूलच्या सभागृहात आयोजित या मेळाव्यास उद्‍घाटक सुप्रसिद्ध चित्रकार पी. ए. सूर्यवंशी, गो.रा ढवळीकर, प्राचार्य गजानन मांद्रेकर, पेडणे प्रखंड प्रमुख शरद गावडे, युवा वक्ते प्रा. नवसो परब, साहिल नारुलकर,सोनाली परब आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना वेलिंगकर म्हणाले, गेली ४० वर्षे गोव्यात मराठीवर अन्याय होत आला आहे, राजकर्त्यांकडून वेळोवेळी मराठी भाषिकांना आश्वासने देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत, अशावेळी आपली ताकद दाखवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. राजभाषेचा हा लढा निर्णायक लढा आहे आता नाही तर कधीच नाही, अशा भावनेने समर्पित वृत्तीने कार्य करण्याची गरज आहे.

पी.ए.सूर्यवंशी यांनी सांगितले,की गोव्यात मराठीच संस्कृती रक्षण करू शकते. मेळाव्यात युवाशक्तीचे प्रदर्शन घडवून प्रा. नवसो परब यांनी ‘नाटक आणि मराठी’, पत्रकार साहिल नारुलकर याने ‘मराठी भाषा आणि संगीत’, सोनाली परब यांनी ‘दैनंदिन व्यवहारात मराठी’ या विषयावर विचार मांडले.

आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही, परंतु आमचा हक्क ज्यावेळी डावलला जातो, तेव्हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. पेडणे तालुक्यात गावागावात आम्ही जागृती केली त्यातूनच हा लोक लढा निर्णायक होण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करूया.
प्राचार्य गजानन मांद्रेकर
पुंडलिक नाईक, प्रकाश वझरीकर यासारखे काही प्रतिभावंत साहित्यिक कोकणीत आहेत. त्यांच्या -कोकणीतून मराठीत भाषांतरित केलेल्या नाटकांना महाराष्ट्रात प्रथम द्वितीय अशी पारितोषिकेही मिळाली आहेत. पण कोकणी हे मर्यादित क्षेत्र असल्याने त्यांचे हे साहित्य मर्यादित राहते.
गो.रा. ढवळीकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात छापा! 8 मोबाईलसह तंबाखू हस्तगत; तुरुंगातील रामभरोसे कारभार उघड

Advalpal: ‘तुम्‍ही करोडो कमावता, आम्‍हाला का नागवता?’ अडवलपालमधील जमीनमालकाचा खाण कंपनीला संतप्‍त सवाल

SCROLL FOR NEXT