Goa Language Dispute Dainik Gomantak
गोवा

Marathi Language: मंगेशीत मराठीप्रेमी एकवटले! राजभाषेसाठी घेणार 20 मेळावे; मातृशक्ती, युवाशक्ती गतिमान

Subhash Velingkar: मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे वीस ठिकाणी मातृशक्ती तसेच युवाशक्ती मेळावे होणार असून त्यासाठी रूपरेषा ठरवून चर्चा करण्यासाठी या बैठकांचे आयोजन करण्यात आले.

Sameer Panditrao

मडकई: गोव्यात मराठीला राजभाषेचा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी मराठीप्रेमी सज्ज झाले असून मराठीच्या राजभाषेचा हा लढा तीव्र करण्यासाठी मातृशक्ती आणि युवाशक्ती गतिमान झाल्या आहेत.

मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे येत्या तीन महिन्यांत वीस ठिकाणी मातृशक्ती तसेच युवाशक्ती मेळावे होणार असून त्यासाठी रूपरेषा ठरवून चर्चा करण्यासाठी या बैठकांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी मंगेशी येथे रविवारी आयोजित बैठकीवेळी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर मराठी राजभाषा निर्धार समितीचे मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, महिला शक्ती प्रमुख डॉ. अनिता तिळवे, समन्वयक श्रीगणेश गावडे, युवा शक्ती प्रमुख विनायक च्यारी, समन्वयक नीतिन फळदेसाई तसेच भारत माता की जय संघाचे चालक गोविंद देव आदी उपस्थित होते.

सुभाष वेलिंगकर म्हणाले की, येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांत राज्यभर युवा शक्ती आणि मातृशक्तीचे मेळावे होणार आहेत.

किमान पाच हजारपेक्षा जास्त मराठीप्रेमींचा अशा प्रत्येक मेळाव्यात समावेश अपेक्षित असून त्यादृष्टीने रचना चालवली आहे. या मेळाव्यासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी प्रखंड प्रमुख तसेच इतर कार्यकारिणी सदस्यांची ही महत्त्वाची बैठक असून मराठीला मानाचे स्थान देण्यासाठी आता माघार नाही, तर मराठीप्रेमी पुढेच जाणार आहेत.

डॉ. अनिता तिळवे म्हणाल्या की, मातृशक्तीच्या माध्यमातून महिलांना एकसंघ करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याला यश येत आहे. मराठी राजभाषा निर्धार समितीच्या माध्यमातून मराठीला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सर्वजण एकत्रित येत आहेत, ही आनंदाची बाब असून मराठीला निश्‍चितच राजभाषेचे स्थान मिळेल.

मराठीप्रेमींचा उत्साह...

मराठीला गोव्यात राजभाषेचे स्थान मिळवून देण्यासाठी मराठीप्रेमी एकवटले आहेत. मंगेशी येथील बैठकीला मराठीप्रेमींची मोठी संख्या उपस्थित होती. मातृशक्ती आणि युवाशक्तीचे मेळावे यशस्वी करण्यासाठी मराठीप्रेमींनी उत्साह दाखवला असून काहीही होवो, पण मराठीला मानाचे स्थान मिळवून देणारच असा निर्धार केला आहे.

‘सर्वांनी एकजूट दाखवावी’

राज्यात मराठीला राजभाषा करण्यासाठी सर्व मराठीप्रेमी संघटित होत आहेत. मराठीला मानाचा मुकुट परिधान करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांमुळे मराठीला निश्‍चितच मानाचे स्थान मिळेल, अशी मनिषा व्यक्त करताना गो. रा. ढवळीकर यांनी सर्वांनी या कार्यात एकजूट दाखवावी आणि मराठीला राजभाषा करण्यासाठी संघटित प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Samaj: भंडारी समाजाच्या नेत्‍यांकडून मोर्चेबांधणी सुरू! एकसंघ करण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरू; लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

Morjim: ...तोपर्यंत ‘त्‍या’ स्मशानभूमीचा वापर नको! न्यायालयाचे निर्देश; मोरजी पंचायतीला धक्का

Drugs In Goa: कैद्यांना जर ड्रग्स मिळत असतील, तर बिट्स पिलानी ‘किस झाड की पत्ती’! गोव्याच्या मानगुटीवर बसलेले भूत

आत्महत्या की हत्या? 24 तास बेपत्ता, झुआरी पुलाजवळ आढळलेला मृतदेह, असोल्डातील व्यक्तीच्या मृत्यूने वाढले गूढ

Valpoi: वाळपईत 4 वर्षांत दगावली 154 गुरे! वाढती प्लास्टिक समस्या चिंताजनक; 12 महिन्यांची वासरेही बाधीत

SCROLL FOR NEXT