Goa Marathi News Dainik Gomantak
गोवा

Goa News: २२ जून ते २८ जून दरम्यान गोव्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण,मनोरंजन,क्रीडा आणि इतर बातम्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

२२ जून ते २८ जून दरम्यान गोव्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

२२ जून ते २८ जून दरम्यान गोव्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. अपेक्षित हवामान परिस्थिती लक्षात घेता यलो इशारा जारी करण्यात आला आहे. २२ जूनपर्यंत, १ जून रोजी मान्सून सुरू झाल्यापासून राज्यात एकूण २२.२१ इंच पाऊस पडला आहे.

दयानंद सामाजीत सुरक्षा योजनेचे राज्यात तब्बल 13 हजार बोगस लाभार्थी, 50 कोटी रुपये पुन्हा सरकारच्या तिजोरीत

समाज कल्याण खात्याकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल 13 हजार सापडले बोगस लाभार्थी. ह्या बोगस लाभार्थ्यांत मृत्यू आलेले, परप्रांतीय आणि ह्या योजनेसाठी पात्र नसलेल्यांचाही होता समावेश. एवढ्या मोठ्या सर्वेक्षणात नजर चुकीने व इतर कारणांमुळे काही जिवंत असलेले पात्र लाभार्थी जिवंत नसल्याचे खात्याकडून बॅंकांना पाठवलेले पत्र मागे घेऊन अशांचे न मिळालेले पैसे देऊन त्यांची योजना सुरुच ठेवणार. समाज कल्याण खात्याचे संचालक अजीत पंचवाडकरांची माहिती.

फातोर्डा विकासावरून वाद

परिसीमांमुळे मी निवडणूक हरलो, फातोर्डामधील सिग्निचर प्रोजेक्ट्स विजयला दाखवण्याच्या माझ्या आव्हानावर मी अजूनही ठाम आहे. मी वादविवादासाठी तयार आहे असे भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियाद्वारे कॅनडामध्ये बनावट नोकरीची ऑफर देऊन ३.३२ लाख रुपये लुटले

सांगे येथील ५१ वर्षीय रहिवासी, एका ऑनलाइन नोकरी घोटाळ्याला बळी पडला, सोशल मीडियाद्वारे कॅनडामध्ये बनावट नोकरीची ऑफर देऊन फसवणूक करणाऱ्यांनी त्याला ३.३२ लाख रुपये गमावले.

बिघाड झालेल्या लिफ्टमध्ये एका १० वर्षांच्या मुलासह तीन जणांचे कुटुंब अडकले

म्हापसा येथील उपनिबंधक कार्यालयात सायंकाळी ७ वाजल्यापासून एका बिघाड झालेल्या लिफ्टमध्ये एका १० वर्षांच्या मुलासह तीन जणांचे कुटुंब अडकले.

वडाचे झाड कोसळून १ कार, २ दुचाकी, ३ घरांचे नुकसान

रुमड - पाळी येथे वडाचे झाड कोसळून १ कार, २ दुचाकी, ३ घराचे नुकसान. फोंडा अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल.

कार व टँकरचा अपघात

संजीवनी साखर कारखान्यासमोर रस्त्यावरील गुरांना वाचवण्याच्या नादात कार व टँकर यांच्यात अपघात. कार चालक जखमी. रस्त्यावर वरील ४ गुरे दगावली. पहाटे अपघात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhausaheb Bandodkar: 'भाऊसाहेब बांदोडकर यांच्यामुळे गोव्याने सर्वच क्षेत्रांत यशस्वी झेप घेतली'; ढवळीकरांचे गौरवोद्गार

Fiscal Health Index: गोव्‍यासाठी खूशखबर! आर्थिक आरोग्‍य निर्देशांकात यंदा दुसरा क्रमांक; CM सावंतांनी केला अहवाल सादर

Goa Politics: खरी कुजबुज; फोंडा पोटनिवडणूक अजूनही ‘वेटिंग’वर

Goa Water Old Pipeline: 'जीर्ण पाईपलाईन बदलल्या जाणार'! मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती; पाणीचोरी, गळती रोखण्‍यासाठी ‘फ्‍लो मीटर्स’

Goa Public Transport: वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी गोव्यात 300 बसगाड्यांची गरज, डॉ. दिव्या राणे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT