Dainik Gomantak
गोवा

Goa News: ग्लोबल विजनला भीषण आग,गोविंद गावडेंचे ढवळीकरांना प्रत्त्युत्तर आणि गोव्यातील बातम्या

Marathi Breaking News 11 January 2025: गोव्यातील राजकारण,क्रीडा, मनोरंजन, क्रिकेट, सण-उत्सव आणि ताज्या घडामोडी

Akshata Chhatre

ग्लोबल विजनला शनिवारी भीषण आग; नुकसानीचा आकडा अद्याप उपलब्ध नाही

तिस्क फोंडा येथील ग्लोबल विजन या चष्म्यांच्या दुकानाला शनिवारी सकाळी आग लागली. फोंडा अग्निशमन दळाच्या पथकाने त्वरित धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीचे निश्चित कारण स्पष्ट झाले नसले तरी विजेचा दाब वाढल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नुकसानीचा आकडा अद्याप उपलब्ध झाला नाही.

स्मार्ट सिटी बनतेय का गांजा सिटी?

आज टोंक पणजी येथे गांजाचे आणखी एक रोप सापडले.

मंत्री गोविंद गावडेंचे दिपक ढवळीकरांना प्रत्त्युत्तर

प्रियोळचे लोकं आणि खासकरुन महिला तृणमूलच्या त्या अर्जांचा हिशोब घेण्यासाठी राहीले आहेत. सरकारात राहून विधाने करण्याऐवजी त्यांनी सरकारातून बाहेर पडून मग बोलावे. मंत्री गोविंद गावडेंचे दिपक ढवळीकरांना प्रत्त्युत्तर.

'तरुण आणि ज्येष्ठ' पक्षाला दोघांची गरज

युथ ब्रिगेडला पक्षाच्या संघटनात्मक कामात सहभागी करून घेण्याची गरज आहे, पण काही ज्येष्ठांचीही सहभाग महत्वाचा.

भाजपच्या उत्तर गोवा जिल्हाध्यक्षपदी दयानंद कारबोटकर यांची बिनविरोध निवड

भाजपच्या उत्तर गोवा जिल्हाध्यक्षपदी दयानंद कारबोटकर यांची बिनविरोध निवड. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री रोहन खंवटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले.

रेतीचा मार्ग मोकळा; मांडवी-झुआरीतून उपशासाठी ईसी मिळणार

रेतीचा मार्ग मोकळा; मांडवी-झुआरीतून उपशासाठी ईसी मिळणार. सविस्तर वृत्त वाचा आजच्या दै.गोमन्तकमध्ये.

भाजपचे केंद्रीय नेतृत्व ठरवणार प्रदेशाध्यक्ष.

भाजपचे केंद्रीय नेतृत्व गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष ठरवणार असून, माझ्या कार्यकाळात प्रदेशाध्यक्ष पदाला पूर्ण न्याय दिला. सदानंद शेट तानावडे यांची माहिती.

राहुल द्रविडला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मोबाईल सोडा, कोलवाळ तुरुंगात टाटा स्कायही सापडला!

Dhirio Goa: बंदी असूनही सोशल मीडियावर 'धीरयो'ची खुलेआम जाहिरात! उच्च न्यायालयाकडून दखल; कारवाईचे निर्देश

Goa Politics: खरी कुजबुज; डिचोलीत भाजपला हुकमी एक्का

Anjuna Theft: गोव्यात सुपर मार्केटमध्ये केली चोरी, थेट सापडला नेपाळ बॉर्डरवर; संशयिताला 6 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Rain: गोवेकर काळजी घ्या! जोरदार पाऊस, उंच लाटांची शक्यता; राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT