Mapusa Urban Bank In Goa Dainik Gomantak
गोवा

Mapusa Urban Bank: ‘म्हापसा अर्बन’ला तारणार

Mapusa Urban Bank In Goa: मंत्री शिरोडकर : व्हिजन, अष्टगंधाचे बोगस कर्जदारही रडारवर

दैनिक गोमन्तक

Mapusa Urban In Goa

तीन वर्षांपूर्वी बुडालेल्या म्हापसा अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंकेचे पतपुरवठा सोसायटीत रूपांतर करण्याचा विचार सरकारने चालवला आहे. ती बॅंक बहुराज्य असल्याने यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय सहकार निबंधकांना पाठवून रिझर्व बॅंकेची त्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.

51 वर्षे जनतेची सेवा केलेली ही बॅंक नष्ट होऊ नये, अशी सरकारची इच्छा असल्याचे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना सांगितले.

बॅंक अवसायनात गेल्यानंतर त्या बॅंकेवर केंद्रीय सहकार निबंधकांनी अवसायनक नियुक्त केलेला आहे. त्याचे काम सुरू आहे. बॅंकेच्या थकीत कर्जाची वसुली सुरू आहे. पाच लाख रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळाले आहेत.

पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या ठेवी असलेल्यांचे पैसे अडकले आहेत. भागभांडवलदार हे बॅंकेचे मालक असल्याने त्यांची रक्कम सर्वांत शेवटी मिळेल, पण ती वेळ येऊच दिली जाणार नाही. बॅंकेचे सोसायटीत रूपांतर केले जाणार आहे, असे सहकारमंत्री

17 कोटींची कर्ज वसुली बाकी: म्हापसा अर्बनच्या २४ शाखा होत्या, त्यातील ९ शाखा स्वतःच्या जागेत होत्या. त्यापैकी आता म्हापसा मुख्यालय, पणजी, रेईशमागूश व वेळगे येथील ९०० चौरस मीटर जमीन एवढीच मालमत्ता शिल्लक आहे.

बॅंक १६ एप्रिल २०२० रोजी बुडाली. तेव्हा ३५४ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. ५० कोटी रुपयांच्या कर्जापैकी ३३ कोटी रुपयांचे कर्ज वसूल केले आहे. त्यामुळे केवळ १७ कोटी रुपये कर्ज वसूल करायचे आहे.

ठेवीदारांचे देणे ७० कोटी रुपये! : प्रत्येकी पाच लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या १ हजार ४०० जणांचे ७० कोटी रुपये म्हापसा अर्बन बॅंकेने देणे आहे. भागभांडवलदारांचे २२ कोटी रुपये बॅंकेत आहेत. २९ कोटी रुपयांवर ७९ हजार खातेधारकांपैकी कोणीही दावा केलेला नाही.

म्हापशात सरकारी संकुलाला लागून बॅंकेची मोठी मालमत्ता आहे, ती सरकारला संकुलाच्या विस्तारासाठी वापरता येणे शक्य आहे. आजच्या बाजारभावाने इमारतीचे मूल्यांकन केल्यास बँकेकडे शिल्लक रक्कम असेल. बँकेचे सोसायटीत रुपांतर केल्यानंतर अनेक शाखाही सुरू करता येतील. ही बँक अनेकांसाठी भावनिक प्रश्‍न आहे. त्यामुळे बँकेचे नाव सोसायटीच्या रुपाने कायम रहावे.
- ॲड. रमाकांत खलप, बँकेचे माजी अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: लाखोंचा गंडा घालणाऱ्या 'दीपश्री'ला कोर्टाचा पुन्हा दणका; सुनावली 8 दिवसांची पोलिस कोठडी

Anmod Ghat: 17 तासानंतर अनमोड घाटातील कोंडी फुटली; बेळगाव-गोवा मार्ग वाहतुकीस खुला

वडाच्या झाडाखाली माडांच्या झावळ्यांचा मंडप, गोव्यात पार पडला प्रस्थापित रिवाजांना फाटा देणारा धनगरी लग्नसोहळा

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

SCROLL FOR NEXT