Goa Taxi Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Issue: "राजकारण करु नका, वेळ आल्यास आमदारांच्या दारावर बसून भीक मागू", टॅक्सीचालकांचा सत्ताधाऱ्यांना संतप्त इशारा

Goa Taxi Drivers Protest: लोकप्रतिनिधींनी आम्हाला अपेक्षित साथ दिली नाही किंवा आमच्या तोंडाला पाने पुसण्‍याचा प्रयत्‍न केला तर आगामी विधानसभा निवडणुकीत राजकारण काय असते ते दाखवून देऊ.

Sameer Amunekar

म्हापसा : लोकप्रतिनिधींनी आम्हाला अपेक्षित साथ दिली नाही किंवा आमच्या तोंडाला पाने पुसण्‍याचा प्रयत्‍न केला तर आगामी विधानसभा निवडणुकीत राजकारण काय असते ते दाखवून देऊ. कुणीही टॅक्सीचालकांच्या उपजीविकेशी राजकारण करू नये. प्रसंगी आमदारांच्या दारावर बसून भीक मागू, असा सज्जड इशारा संतप्‍त टॅक्सीचालकांनी दिला.

राज्य सरकारच्या प्रस्तावित ‘कॅब अ‍ॅग्रिगेटर’ धोरणाविरोधात सध्या स्थानिक पारंपरिक टॅक्सीचालकांनी एल्गार पुकारला आहे. आता निर्णायक लढा देण्‍याचा त्‍यांनी निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी कळंगुट व शिवोली या दोन्ही मतदारसंघांतील टॅक्सीचालकांनी आमदार मायकल व दिलायला लोबो यांची, त्यांच्या पर्रा येथील निवासस्थानी भेट घेतली. त्‍यावेळी त्‍यांनी वरील इशारा दिला.

आमदारांनी आमच्या पाठीशी उभे राहावे व कॅब अ‍ॅग्रिगेटरला त्यांनी विरोध करावा अशी मागणी टॅक्सीचालकांनी केली. या चर्चेवेळी टॅक्सीचालक व आमदारांमध्ये काहीकाळ वैचारिक मतभेदांमुळे खटके उडाले. काही टॅक्सीचालकांनी आमदारांना भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न केला तर काही टॅक्सीचालकांनी आमदारांसमक्ष प्रस्तावित कॅब अ‍ॅग्रिगेटर धोरणाच्या राजपत्राची प्रत फाडून आपला रोष व्यक्त केला.

सरकारमान्‍य ॲप्‍स स्‍वीकारा : पर्यटन खाते

गोव्यातील पर्यटन अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी सर्व टॅक्सीचालकांनी ‘गोवा टॅक्सी अ‍ॅप’ आणि ‘गोवा माईल्स’ या मान्यताप्राप्त अ‍ॅपशी स्‍वत:ला जोडून घ्‍यावे, असे आवाहन गोवा पर्यटन विभागाने केले आहे. सुरक्षित वाहतूक आणि शिस्तबद्ध पर्यटन व्यवस्थेच्‍या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या दोन्ही अ‍ॅप्सच्या माध्यमातून केवळ एका वर्षात ७० हजारांपेक्षा अधिक प्रवास झाले असून एक हजाराहून अधिक चालक अ‍ॅपवर सहभागी झाले आहेत. दोन्ही अ‍ॅप्सद्वारे सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार भाडे आकारले जात आहे. सेवेच्या गुणवत्तेस प्राधान्य देण्यासाठी रेटिंग्स आणि लाईव्ह मॉनिटरिंग सुविधा उपलब्ध आहेत, असे संचालक केदार नाईक यांनी सांगितले.

सरकारातील घटकांचा ॲपला पाठिंबा

गोव्यातील पर्यटन व्यवसायास चालना देण्यासाठी ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या काही काळापासून जोर धरत आहे. टॅक्सी ऑपरेटरांच्या असंघटित कार्यपद्धतीमुळे पर्यटकांना होणाऱ्या गैरसोयींचा मुद्दा मांडत ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा’ या संघटनेने यापूर्वी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्या खटल्यात उच्च न्यायालयानेही राज्य सरकारला ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील तीन प्रमुख नेते पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात आणि आमदार मायकल लोबो यांनी उघडपणे ॲप आधारित टॅक्सी सेवेला पाठिंबा दर्शवला आहे.

टॅक्सीव्यवसायाच्या व्यवहारात पारदर्शकता महत्त्‍वाची आहे. कारण पर्यटकांनी येथून जाताना चांगल्या आठवणी सोबत न्‍याव्‍यात अशी सरकारची भावना आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेऊ. कारण चर्चेतूनच तोडगा निघेल. ग्राहक या नात्याने पर्यटक काय बोलतात याची आम्हाला कल्पना आहे. दर्जेदार व चांगले पर्यटन हवे असल्यास काही गोष्टींबाबत तोडगा काढला पाहिजे. - मायकल लोबो, आमदार (कळंगुट)

गोव्यातील पर्यटन क्षेत्र जगाच्या तुलनेत मागे पडत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत टिकायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे गरजेचे आहे. ॲपवरून टॅक्सी सेवा ही त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरेल. - रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT