Goa Three Year Old Girl Assault Dainik Gomantak
गोवा

Sexual Assault: संतापजनक घटना! म्हापशात तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून तपास सुरू

Goa Three Year Old Girl Assault: एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Sameer Amunekar

म्हापसा: एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फुगे विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या मुलीला एका व्यक्तीने कथितरित्या पळवून नेले. त्यानंतर तिला एका निर्जन इमारतीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

निर्जन इमारतीत नेऊन अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, म्हापसा येथे फुगे विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका विक्रेत्याची तीन वर्षांची मुलगी या घटनेची पीडित आहे. आरोपीने कथितरित्या चिमुरडीला आपल्या ताब्यात घेऊन एका निर्जन इमारतीत नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

चिमुरडीची प्रकृती गंभीर; GMC मध्ये उपचार सुरू

या घटनेत जखमी झालेल्या चिमुरडीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. तिला पुढील उपचारांसाठी गोवा मेडिकल कॉलेज (GMC) येथे हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. चिमुरडीच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती अद्याप समोर आलेली नाही.

आरोपीचा शोध सुरू; फॉरेन्सिक टीम घटनास्थळी जाणार

दरम्यान, म्हापसा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे. घटनेशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी भेट देणार आहे. घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नमुने आणि पुरावे तपासले जाण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील प्रत्येक बाबीची चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Fire Accident: दिवाळीचा आनंद शोकात बदलला! मध्य प्रदेश ते महाराष्ट्र, आसामपर्यंत आगीच्या दुर्घटनांमध्ये 30 हून अधिक बळी; अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

IND vs NZ 3rd ODI: वनडे मालिकेदरम्यान न्यूझीलंडला दुहेरी झटका, 2 स्टार गोलंदाज बाहेर; संघात नव्या खेळाडूची एंट्री

Uttar Pradesh Car Accident: ...अन् काही सेकंदात सगळं संपलं! मुझफ्फरनगरमध्ये कार जळून खाक, 6 जणांचा होरपळून मृत्यू; वेगाची किंमत प्राणांनी चुकवली

भारताचा 'सुपरमॅन' अवतार! येमेनमध्ये अडकलेल्या 19 खलाशांना मृत्यूच्या दारातून आणले; रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

Egypt Trains Accident: रेल्वे प्रवाशांवर काळाचा घाला! इजिप्तमध्ये दोन रेल्वे गाड्यांची जोरदार टक्कर; 4 ठार, 88 जखमी

SCROLL FOR NEXT