Goa Mapusa Public Toilet Dainik Gomantak
गोवा

Mapusa: दुसऱ्यांदा स्वच्छतागृह तोडण्याचा प्रयत्न; जमिनीवर डोळा

Mapusa Toilet Illegal Demolition: जुने सार्वजनिक स्वच्छतागृह काही अज्ञात व्यक्तींकडून मोडण्याचा प्रयत्न दक्ष स्थानिक लोकांसह नगरसेवकाने रविवारी हाणून पाडला

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : खोर्ली येथील प्रभाग १८ मधील वापरात असलेले जुने सार्वजनिक स्वच्छतागृह काही अज्ञात व्यक्तींकडून मोडण्याचा प्रयत्न दक्ष स्थानिक लोकांसह नगरसेवकाने रविवारी हाणून पाडला. शहरात मागील काही दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.

पालिकेच्या मालकी असलेल्या बांधकामावर अनधिकृतपणे हटवून जागा बळकावण्याचा प्रयत्न होतोय असे दिसते. पहिल्या प्रकरणात पालिकेने कुठलीही कारवाई केली नसल्यानेच अशा बेकायदा प्रकारांना प्रोत्साहन मिळते अशी चर्चा शहरात आता सुरू झाली आहे.

दरम्यान, दोन्ही घटना या रविवारी सुटीच्या दिवशी अमलात आणण्याचा प्रयत्न झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास खोर्ली, कासारवाडा येथील सार्वजनिक स्वच्छतागृह हटविण्याचे काम कामगारवर्गाकडून सुरू होते.

याची खबर लागताच स्थानिक नगरसेवक अन्वी कोरगावकर, त्याचे पती अमेय कोरगावकर व रहिवासी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कामगारांना तसेच कंत्राटदारास जाब विचारला, परंतु संबंधितांकडे समर्पक उत्तर नव्हते. लोकांचा वाढता विरोध आणि हस्तक्षेपानंतर कामगार व कंत्राटदाराने घटनास्थळावरून काढता पाय घेतला. त्यांनी कुणी पाठविले याचे उत्तर दिले नाही.

कारवाई होणे गरजेचे : कोरगावकर

याप्रकरणी स्थानिक नगरसेवक कोरगावकर यांनी सांगितले की, आज रविवारी आमच्या प्रभाग मधील वापरात असलेले जीर्ण सार्वजनिक स्वच्छतागृह मोडण्याचा प्रयत्न झाला. अनोळखी व्यक्तीने मजुरांच्या साहाय्याने ते जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही ते रोखले. याविषयी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनाही माहिती दिली. नगराध्यक्ष नूतन बिचोलकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या बेकायदा कृत्यामागे असलेल्या दोषींवर कारवाई होणे गरजेचे असून आम्ही पोलिस तक्रारीची मागणी करतो. हे शौचालय लोक वापरत होते, एकीकडे सरकार राज्य ओडीएफ मुक्त करते, मात्र काही बेजबाबदार व्यक्ती मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही.

पहिल्या घटनेत कारवाई नाही !

अन्साभाट येथील प्रभाग १० मध्ये अशाचप्रकारे वापरात नसलेले जुने स्वच्छतागृह गेल्या जूनमध्ये जमीनदोस्त करण्यात आले. याप्रकरणी पालिकेने अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. पालिकेने तेव्हाच कडक कारवाईचा बडगा उगारला असता, तर अशाप्रकारे दुसरी घटना घडली नसती. तसेच कुणाचेही धाडस झाले नसते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT