Child Assault Case Dainik Gomantak
गोवा

Child Assault Case: 4 वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणाचा तपास धारवाडपर्यंत पोहोचणार; संशयिताच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पोलिसांकडून चौकशी

Goa Crime News: पुंडलिक हा गेल्या १० वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास असून हमाली तसेच इतर छोटी-मोठी कामे करत होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: येथील चार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित पुंडलिक गुडगे (वय २८ वर्षे, मूळ धारवाड-कर्नाटक) याला गजाआड केल्यानंतर म्हापसा पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा छडा लावण्याच्या दृष्टीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

पुंडलिक हा गेल्या १० वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास असून हमाली तसेच इतर छोटी-मोठी कामे करत होता. मात्र, यापूर्वी त्याच्यावर मूळ गावी अथवा अन्यत्र काही गुन्हे दाखल आहेत का, याची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक शुक्रवारी धारवाडमधील त्याच्या मूळ गावी ह्याबळ्ळी रवाना होणार आहे.

म्हापसा पोलिस त्याच्या नातेवाईकांची चौकशी करण्यासह कर्नाटक पोलिसांची भेट घेऊन त्याची सर्व माहिती गोळा करणार आहेत. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, की रविवार ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते ९.३० च्या सुमारास संशयिताने म्हापसा बाजारपेठेतून चार वर्षांच्या चिमुरडीला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिला एका जीर्णावस्थेतील इमारतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तीन दिवसांनी म्हणजेच बुधवारी (ता. ११) सकाळी ७ वाजता पणजी कदंब बसस्थानकावरून पुंडलिकच्या मुसक्या आवळल्या. चौकशीवेळी त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली असून, सध्या तो पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे. आता त्याच्या मूळ गावी जाऊन चौकशी करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New Zealand vs India 4th ODI: रोहित, विराट अन् अय्यर... तिघांच्याही पदरी भोपळा! टीम इंडियाची लाजिरवाणी सुरुवात, पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट VIDEO

Pitbull Dog Attack: कुत्रा भुंकण्यावरून वाद, 70 वर्षीय ज्येष्ठाच्या अंगावर सोडला पिटबुल! हळदोणेतील धक्कादायक घटनेत वृद्ध गंभीर जखमी

Farmers Subsidy Increase: गोव्यात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; नुकसानग्रस्तांना मिळणारे अनुदान वाढविणार, कृषिमंत्री संकल्प आमोणकर यांनी घेतला पदभार

Rohit Sharma Catch: वयाच्या 39व्या वर्षी रोहित शर्माची मैदानात 'चित्त्यासारखी' झेप! हवेत डाइव्ह मारत पकडला भन्नाट झेल, पाहा VIDEO

Smart Meter Project: स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करता येणार नाही! वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे स्पष्ट संकेत; म्हणाले, 'येणारा काळ तंत्रज्ञानाचा'

SCROLL FOR NEXT