Mapusa Police With accused  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : घरफोडीतील संशयिताकडून साडेसात लाखांचे दागिने जप्त; म्हापसा पोलिसांची कारवाई

संशयिताची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने घरफोड्या केल्याचे कबूल केले.

गोमन्तक डिजिटल टीम

घर फोडीच्या अनेक घटनांमध्ये सहभागी असल्याचा संशयावरुन म्हापसा पोलीसांनी काही दिवसांपूर्वी पंजाबमधील संशयित सुमीर शर्मा याला अटक केली होती. या संशयिताची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने घरफोड्या केल्याचे कबूल केले.

त्यानुसार एसडीपीओ जिवबा दळवी यांच्यासह पोलीस निरीक्षक शिताकांत नायक, विजय राणे, पीएसआय यशवंत मांद्रेकर, बबलो परब यांचा समावेश असलेल्या एका विशेष टीमने आरोपीची कसून चौकशी केली. चौकशीत गुन्हा कबूल केला.

यातील पहिला गुन्हा म्हापसा पोलिसांत 6 जूनला काणका येथील तक्रारदाराच्या तक्रारीवरुन नोंद केला होता. यात संशयिताने तक्रारदाराच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करीत सोने, 7 लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. अधिक चौकशी केली असता कानातले, सोनसाखळी असा एकूण 4 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अधिक चौकशी केली असता संशयिताने कोलवाळ येथे घरफोडी केल्याचे कबूल केले. याप्रकरणी थिवी येथील तक्रारदाराने 17 फेब्रुवारी रोजी कोलवाळ येथील पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

संशयिताने तक्रारदाराच्या थिवी येथील घराचा मुख्य दरवाजा उघडून 5 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. संशयिताच्या ताब्यातून 3 लाख 20 हजार रुपयांचे सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याचे झुमके जप्त करण्यातही पोलिसांना यश आले आहे.

म्हापसा पोलिसांनी आरोपीकडून एकूण 7 लाख 50 हजार रुपये किमतीचे 132 ग्रॅम सोने जप्त केले. तसेच संशयिताने गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. दिवसा एकटेच निवासी भागात फिरुन बंद फ्लॅटला लक्ष्य करणे ही संशयित आरोपीची मोडस ऑपरेंडी असल्याची माहिती एसडीओपी जिवबा दळवी यांनी दिली.

म्हापसा पोलिसांचे एक पथक पुढील वसुलीसाठी दिल्लीला रवाना झाले आहे तर उत्तर गोव्याचे एसपी निधिन वाल्सन यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT