Gos Bank Loan Frauds Dainik Gomantak
गोवा

ग्राहकांचा डेटा चोरून लाखोंचे कर्ज उचलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! बँक अधिकाऱ्यांच्याच सहभागाची शक्यता?

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Axis Bank Loan Scam

म्हापसा: अ‍ॅक्सिस बँकेच्या उत्तर गोव्यातील ग्राहकांचा डेटा चोरून त्यांच्या नावाने परस्पर आर्थिक व्यवहार करीत कर्ज उचलणाऱ्या टोळीचा म्हापसा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद हसीम (वय ३३ वर्षेे, मूळ दिल्ली) आणि मुश्ताक अहमद (वय ३३ वर्षे, मूळ उत्तर प्रदेश) या दोघांना अटक केली आहे.

अ‍ॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) म्हापसा शाखेचे उपव्यवस्थापक कमल पाठक हे फिर्यादी आहेत. संशयितांनी २० ते २१ सप्टेंबरदरम्यान म्हापसा शाखेतून हा आर्थिक व्यवहार करीत बँकेची तसेच ग्राहकांची फसवणूक केली होती.

या टोळीत अनेकजण असावेत, असा कयास असून संशयितांनी शिवोली, म्हापसा, पर्वरी, पणजी, डिचोलीमधील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखांमधील बऱ्याच ग्राहकांचा डेटा चोरून, परस्पर आर्थिक व्यवहार केला आहे. ही बनवेगिरी लाखो रुपयांच्या घरात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मोबाईल नंबरही बदलले

संशयितांनी ग्राहक अर्जावर खोटी सही करून खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर बदलण्याची विनंती करून संबंधित ग्राहकांच्या अकाऊंटवरून आर्थिक व्यवहार केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंदवून, मोहम्मद आणि त्याचा साथीदार मुश्ताक या दोघांना अटक केली. या संशयितांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बँक अधिकाऱ्यांचा सहभाग शक्य

संशयितांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने खातेधारकांची माहिती चोरली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संशयित मोहम्मद हसीमने बनावट ओळखपत्र दाखवून अ‍ॅक्सिस बँकेचा ग्राहक असल्याची तोतयागिरी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'काही वेळा काय करावे हेच समजत नाही'; प्रशिक्षक मार्केझनी FC Goaच्या असमाधानकारक कामगिरीची जबाबदारी स्वीकारली

Sattari News: ...आणि सभा तापली! सत्तरी शेतकरी सोसायटी आमसभेत आरोप प्रत्यारोपांमुळे गोंधळ

Miss Universe India: 51 स्पर्धकांना मागे टाकत 19 वर्षीय रिया सिंघा बनली मिस युनिव्हर्स इंडिया!!

Navelim News: पुन्हा अडथळा! नावेली आरोग्य केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम स्थगित; आरोग्य खात्याचे सरकारकडे बोट

Goa News: गोवा पर्यटन विभागाचा अमृतसरमध्ये डंका! 'ITM 2024’ मध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट दालन पुरस्कार

SCROLL FOR NEXT