Mapusa police arrest Accused Dainik Gomantak
गोवा

Crime News: अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी 20 वर्षीय युवकास अटक; म्हापसा पोलिसांची कारवाई

संशयित हा चिकन दुकानात कामाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अयोग्यरित्या स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी 20 वर्षीय युवकाला अटक केली. माजीद खान (रा. बसतोडा, मूळ. राजस्थान) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा विनयभंगचा प्रकार 2 सप्टेंबरला सिनेअलंकार जवळील रस्त्यावर घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस स्थानकात तक्रार दिली.

तक्रारीच्या आधारे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी पीआय सीताकांत नायक यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय यशवंत मांद्रेकर, एलपीएसआय रुपाली गोवेकर, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, शिवाजी शेटकर, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय पोळेकर, अक्षय पाटील, आनंद राठोड अंकेश दाभाळे यांच्या समावेश असलेली दोन पथके स्थापन केली.

पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. संशयिताची ओळख पटल्यावर पाळत ठेवत सापळा रचून बार्देश येथे अटक करण्यात आली.

पोलिसांनी संशयित विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 354 व गोवा बाल कायदा कलम 8 आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. संशयित हा चिकन दुकानात कामाला आहे.

पुढील तपास उत्तर गोव्याचे एसपी निधिन वाल्सन, एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी आणि पीआय सीताकांत नायक यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT