Mapusa Dangerous Buildings Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्हापशातील ‘ते’ जीर्ण घर जमीनदोस्त! पालिकेची कारवाई; नागरिकांचा सुटकेचा निश्वास

Mapusa Old Buildings: जुन्या एसटी स्थानकासमोरील तसेच क्रांतिवीर चौकाजवळील एक मजली घर जे मोडकळीस आले होते, ते आज म्हापसा नगरपालिकेने जमीनदोस्त केले.

Sameer Panditrao

म्हापसा: जुन्या एसटी स्थानकासमोरील तसेच क्रांतिवीर चौकाजवळील एक मजली घर जे मोडकळीस आले होते, ते आज म्हापसा नगरपालिकेने जमीनदोस्त केले.

राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या मालकीच्या या बंगल्यामध्ये डॉ. चंदू बोरकर कुटुंबीयांचे वास्तव्य होते. दुरुस्तीअभावी ही इमारत मोडकळीस आल्याने बोरकर कुटुंबीयांनी घराचा ताबा सोडल्यानंतर गेली काही वर्षे हे घर विनावापर पडून होते.

सार्वजनिक जीवाला धोकादायक असल्यामुळे पालिकेने संबंधित जमीनदार राजेंद्र प्रभुदेसाई व डॉ. चंदू बोरकर यांच्या वारसदारांना नोटीस बजावून हे घर स्वतःहून पाडण्याची सूचना केली होती.

त्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये या इमारतीचा दर्शनी भाग कोसळला होता. त्यापासून पालिकेने या इमारतीच्या विरोधात सार्वजनिक सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यक पाठपुरावा केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mulgao Mining: मुळगावातील खाणीवरील पावसाळापूर्व काम रोखले, उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा ग्रामस्थांचा दावा

Goa Education: शैक्षणिक वर्षाचा 15 दिवसांतच 'फज्जा'! उकाडा, शिक्षकांच्‍या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची शाळांकडे पाठ

मुंबई इंडियन्सच्या गोटात बदलाचे संकेत, हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून डच्चू मिळणार? 'हा' खेळाडू सांभाळणार संघाची धुरा

खरी कुजबुज: गोवा भारतापासून वेगळा?

Smart Electricity Meter: 'स्मार्ट मीटर'बाबत लोकांत अज्ञान! ‘स्मार्ट जनजागृती झाली नाही; वीजमंत्री ढवळीकरांची अप्रत्यक्ष कबुली

SCROLL FOR NEXT