Old Kadamba Bus Stand Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्हापसा बसस्थानक की कचरास्थानक? जुन्या कदंब बसस्थानकात पाय ठेवाल तिथे अस्वच्छतेचा कळस!

Mapusa: प्रशासकीय यंत्रणांकडूनच बेशिस्तपणा व निष्काळजीपणा होत असल्याने बसस्थानकाचे हे हाल झाले.

दैनिक गोमन्तक

Mapusa: उत्तर गोव्यातील सर्वाधिक मोठे बसस्थानक अशी ओळख असलेल्या म्हापसा जुन्या कदंब बसस्थानकात सध्या अस्वच्छतेने कळस गाठला आहे. प्रशासकीय यंत्रणांकडूनच बेशिस्तपणा व निष्काळजीपणा होत असल्याने हे बसस्थानक की कचरास्थानक, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बसस्थानकाच्या फलटावर नियमित झाडलोट होत असल्याने तिथे काही प्रमाणात स्वच्छता दिसते. मात्र, या इमारतीच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्याचे प्रकार सुरूच आहेत. येथील आवारातील इमारत, भिंती तसेच कोपरे या तंबाखू व पान खाऊन थुंकल्याने रंगल्याचे चित्र आहे. बसस्थानकाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य दिसते.

दुकानांमागे जाळतात कचरा

म्हापसा बसस्थानक परिसरात अनेक गाळेवजा दुकाने आहेत. हे दुकानदार अनेकदा आपल्या आस्थापनातील कचरा तिथेच दुकानामागे कथितरीत्या गोळा करून जाळतात. तसेच तंबाखूजन्य पदार्थ खाऊन त्यांची पाकिटे स्थानकावर पसरलेली दिसतात. याशिवाय बस पार्क करतात, त्याच्या मागील भिंतींवर काही प्रवासी व ये-जा करणारे लघुशंका करतानाचे चित्र पाहायला मिळते.

नवीन बसस्थानकात स्वच्छता

जुन्या बसस्थानकाची दुरवस्था पाहून प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने बसस्थानक व्यवस्थापनाने अधिकाऱ्यांच्या साहाय्याने योग्य पाऊल उचलण्याची मागणी होत आहे. तर नवीन बसस्थानकाच्या परिसरात बऱ्यापैकी स्वच्छता दिसून येते. या ठिकाणी फक्त आंतरराज्य बसेस लागतात.

  • या बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांना परिसरात असणाऱ्या हॉटेलमधील पाणी प्यावे लागते.

  • प्रवाशांना बसस्थानकामध्ये बसण्यासाठी केलेली व्यवस्थाही अपुरी आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीचाही त्रास होतो.

  • बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच जिथे बसगाड्या आत येतात, तिथे गेटशेजारीच कचरा फेकला जातो.

  • येथील शौचालयांत स्वच्छतेचा अभाव आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्‍न उद्‌भवतो.

  • 26 जून 1989 रोजी म्हापसा केटीसी बसस्थानकाचे लोकार्पण झाले होते.

  • 1,000 बसेस येथून दिवसाला ये-जा करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kisan Credit Card Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आरबीआयने 'किसान क्रेडिट कार्ड'च्या नियमात केला मोठा बदल; कधीपासून होणार लागू?

Goa Police: पीएसआय पदे तात्काळ भरा, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना न्याय द्या; गिरीश चोडणकरांची मागणी

Khazan Farming: एकात्मिक शेती पीक: मेरशीतील खाजन शेतीत अभिनव प्रयोग, आयसीएआरच्या ‘लँड-शेपिंग’ मॉडेलचा वापर

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 'ही' मागणी मंजूर झाल्यास पगारात 51 हजार रुपयांची वाढ होणार

Viral Video: फुटबॉल सामन्यात अचानक गाईची एन्ट्री; मैदानावर दाखवली भन्नाट ड्रिब्लिंगची कला! व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT