Mapusa Municipal workers Strike Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Workers Strike : संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; म्हापसा पालिकेकडून तिघांना नोटीस

कुचेली प्रकल्पातील कचरावाहू ट्रकची नासधूस केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Municipal Workers Strike : म्हापसा नगरपालिकेने संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून कुचेली प्रकल्पातील कचरावाहू ट्रकची नासधूस केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

21 ऑक्टोबरला स्वतःच्या मागणीपत्राच्या पूर्तर्तेसाठी म्हापसा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांसोबत बैठक घेत संप स्थगित ठेवला. यानंतर आता पालिका मंडळाने संपातील कर्मचाऱ्यांवर कारवाईचे सत्र आरंभले आहे. कुचेली कचरा प्रकल्पाच्या आवारात पार्क केलेल्या कचरावाहू वाहनाची अज्ञातांकडून नासधूस करून सार्वजनिक मालमत्तेची मोडतोड केल्याची तक्रार पालिका मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांत दाखल केली आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तसेच कर्मचारी संघटनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

म्हापसा पालिकेचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पालिकेने पूर्ण न केल्यामुळे संपावर जात असल्याची माहिती कामगार संघटनेचे नेते केशव प्रभू यांनी दिली होती.

कामगारांच्या मागणीपत्रात, वैद्यकीय भत्ता हा 6 हजार रुपयांवरुन तो 8 हजार करावा. तसेच शस्त्रक्रिया आणि आजारपणात कर्मचारी किंवा त्यांच्या कुटूंबीयांना जीएमसीत उपचार मिळावा. जीएमसीत उपचार नसल्यास इतरत्र खासगी इस्पितळात उपचार द्यावेत. या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी पालिकेने स्वीकारावी. त्याचप्रमाणे, कचरा, ध्वजारोहण, रेनवेअर भत्ता, हाऊसिंग योजना, कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती अशा एकूण 19 कलमी मागणी पत्राच्या पूर्ततेसाठी अखिल गोवा पालिका कर्मचारी संघटनेने म्हापसा पालिकेला नोटीस दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Lalbagh Mango: कर्नाटकातील 'लालबाग' आंबा डिचोलीच्या बाजारपेठेत दाखल, किलोचा दर 200 रुपये

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

SCROLL FOR NEXT