Mapusa Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: सेवा करूनही वेतन कापले! म्हापसा पालिकेतील गोंधळामुळे कर्मचाऱ्यांच्यात नाराजी

Mapusa Municipal Council: ऑगस्ट महिन्यात या कर्मचाऱ्यांनी कायदेशीररित्या बीएलओची सेवा बजावली होती. सदर सेवेतील दिवसांचा पगार मासिक वेतनातून कापला गेला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: येथील पालिकेने पालिका कर्मचारी असलेल्या १० बुथस्तरीय अधिकाऱ्यांचे (बीएलओ) वेतन कापले आहे. ऑगस्ट महिन्यात या कर्मचाऱ्यांनी कायदेशीररित्या बीएलओची सेवा बजावली होती. सदर सेवेतील दिवसांचा पगार मासिक वेतनातून कापला गेला आहे.

सरकारच्या निर्देशानुसार विधानसभा मतदारसंघाच्या साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत म्हापसा नगरपालिकेतील ५ अधिकारी व ५ पर्यवेक्षक अशा दहा कर्मचाऱ्यांची बुथस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नेमणुकीचे पत्र संबंधित साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून पालिकेला सादर करण्यात आले आहे.

या दहा अधिकाऱ्यांपैकी ५ जण दर शुक्रवारी, तर पर्यवेक्षक असलेले ५ जण दर शुक्रवार व शनिवारी बीएलएओची सेवा मामलेदार कार्यालयात बजावतात. यातील ८ जण म्हापसा मतदारसंघात, एक पर्वरी तर एक डिचोली मतदारसंघात बीएलओ म्हणून कार्यरत आहे.

या कर्मचाऱ्यांची ऑगस्ट महिन्याच्या वेतनातून बीएलओंच्या सेवा काळाचा पगार कापण्यात आला आहे. या एकंदरीत अन्यायामुळे बीएलओ कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मामलेदार

असलेले साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा व आम्हाला हक्काचा पूर्ण मासिक पगार मिळवून द्यावा, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT