Mapusa News: वीजजोडणीच्या नावाखाली लूट! म्हापसा मार्केटमधील धक्कादायक प्रकार

Mapusa Market News: वीजजोडणी देण्यासाठी दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत. मुळात वीज विभागाने असे कुठलेच निर्देश किंवा सूचना केली नसताना एकप्रकारे ही लूट असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते जितेश कामत यांनी केला आहे.
Mapusa Market News: वीजजोडणी देण्यासाठी दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत. मुळात वीज विभागाने असे कुठलेच निर्देश किंवा सूचना केली नसताना एकप्रकारे ही लूट असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते जितेश कामत यांनी केला आहे.
Mapusa Market Shopkeepers Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Market Electricity Connections Illegal Charges

म्हापसा: येथील बाजारपेठेत भूमिगत वीज वाहिन्यांचे काम पूर्णत्वास आले असून येथील दुकानदारांना नवी वीजजोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु वीजजोडणी देण्यासाठी दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत. मुळात वीज विभागाने असे कुठलेच निर्देश किंवा सूचना केली नसताना एकप्रकारे ही लूट असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते जितेश कामत यांनी केला आहे. हा कथित गैरप्रकार वीज मंत्र्यांच्या नजरेस आणून देणार, असे कामत यांनी सांगितले.

कामत यांनी मंगळवारी सायंकाळी मार्केटमध्ये माध्यमांना ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून क्लिफ गोन्साल्विस नामक एक व्यक्ती दुकानदारांकडून नवी वीजजोडणी देण्याच्या बहाण्याने पैसे मागत आहे.

मुळात वीज विभागाने असे कुठलाच आदेश काढलेला नाही. ही वीजजोडणी निःशुल्क आहे. परंतु ही व्यक्ती जोडणीसाठी प्रत्येक दुकानदारांकडून वेगवेगळ्या स्वरूपात शुल्क मागत आहे. त्यासाठी दुनदारांवर दबाव आणत आहे. तसेच जो दुकानदार पैसे देत नाही, त्याला वीजजोडणी देत नाही, असा दावा जितेश कामत यांनी केला.

निःशुल्क सेवा

याबाबत आपण वीज विभागाचे कार्यकारी अभियंत्यांशी फोनवरून संपर्क साधला असता अभियंत्यांनी वीजजोडणीसाठी पैसे घेण्याबाबत कुठलेच प्रशासकीय आदेश किंवा तरतूद वीज विभागाने केलेली नाही. मुळात ही सेवा निःशुल्क (मोफत) आहे. यासाठी अतिरिक्त पैसे भरण्याची गरज नाही. त्यामुळे कुणी पैसे मागत असल्यास ते देऊ नये, असे सांगितल्याचे कामत म्हणाले.

दीडशे ते दीड हजार रुपये

सध्या बाजारातील दुकानदारांकडून १५० रुपये, ५०० रुपये, ६०० रुपये तसेच दीड हजार रुपयापर्यंत वीजजोडणीच्या नावाने पैसे घेतले गेले आहेत. हे पैसे आकारताना, पावती सुद्धा दिली जात नाही, असे कामत यांनी सांगितले.

Mapusa Market News: वीजजोडणी देण्यासाठी दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत. मुळात वीज विभागाने असे कुठलेच निर्देश किंवा सूचना केली नसताना एकप्रकारे ही लूट असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते जितेश कामत यांनी केला आहे.
Mapusa News: विनाकारण सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा! हिंदू संघटनांचे पोलिसांना निवेदन

पैसे परत करणार

म्हापसा बाजारातील ज्या दुकानदारांकडून वीजजोडणीसाठी पैसे आकारण्यात आले आहेत, त्यांची नावे कार्यकारी अभियंत्यांनी देण्यास सांगितली आहे. त्यानुसार संबंधित कंत्राटदार किंवा त्या व्यक्तीकडून ते पैसे पुन्हा दुकानदारांना परत केले जातील, असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याचे कामत यांनी नमूद केले. आतापर्यंत अनेक दुकानदारांनी वीजजोडणीसाठी संबंधित व्यक्तीला पैसे दिले आहेत. काहीजणांकडून दीडशे ते दीड हजरापर्यंत उकळण्यात आले आहेत, असे कामत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com