Mapusa Municipal Council  Dainik Gomantak
गोवा

म्हापसा पालिका सभांचे ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ करा

पालिकेच्या कामकाजाची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी म्हापसा मुख्याधिकार्‍यांचे आदेश

दैनिक गोमन्तक

योगेश मिराशी

म्हापसा : म्हापसा पालिकेच्या कामकाजाची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी यापुढे पालिका मंडळाच्या सर्व सभांचे ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ करावे, असा आदेश म्हापसा मुख्याधिकार्‍यांनी दिला आहे. या पालिकेवरील स्थानिकांचा विश्वास अबाधित ठेवण्यासोबतच, पालिका कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी यापुढे पालिका मंडळाच्या सर्व सभांचे संपूर्ण चांगल्या दर्जाच्या ध्वनीसह व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असे निर्देशच मुख्याधिकार्‍यांनी पालिका मंडळाला दिले आहेत.

या निर्देशाचे दूरगामी परिणाम होणार असून, खर्‍या अर्थाने या पालिकाचे कामकाज हे आता नागरिकांसाठी खुले होणार आहे. सभांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे सभेत नक्की कुठल्या नगरसेवकाने काय म्हटले होते, याची अचूक माहिती व डेटा उपलब्ध राहणार आहे. अनेकदा या सभांवेळी नगरसेवक एक बोलतात, मात्र नंतर सभेतील इतिवृत्तांत दुसरेच नमूद केले जाते. त्यामुळे इतिवृत्तांच्या वाचनावेळी अनेकदा गोंधळ उडतो आणि अकारण वेळेचा सुद्धा अपव्यय होतो.

हे प्रकार अलिकडे म्हापसा पालिका मंडळाच्या सभांत प्रामुख्याने जाणवत आहेत. तत्कालिन पालिकेच्या बैठकीवेळी याच मुद्द्यावरुन नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकरांवर प्रश्नांची सरबत्ती करुन त्यांना धारेवर धरले होते. बैठकीत भिवशेट यांनी एका ठरावाच्या विरोधात मतदान केले होते. मात्र, त्यानंतरच्या दुसर्‍या बैठकीत या वरील सभेच्या इतिवृत्तांत वाचनावेळी भिवशेट हे या संबंधित ठरावापासून दूर राहिले होते, असे म्हटले होते.

हा गैरप्रकार लक्षात येताच भिवशेट यांनी नारजी व्यक्त करीत थेट पालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. नंतर ही चूक दुरुस्त करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकाराची मुख्याधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली असून, पालिका मंडळाच्या कामकाजात पारदर्शकता असावी आणि भविष्यात असे कथित गैरप्रकार टाळण्यासाठीच यापुढे पालिका मंडळाच्या सर्व सभांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक असेल, असे निर्देश मुख्याधिकार्‍यांनी म्हापसा पालिकेला दिले आहेत. शिवाय पालिकेने व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी चांगल्या दर्जाच्या साउंड सिस्टिमची व्यवस्था करावी, असे मुख्याधिकार्‍यांनी या आदेशात म्हटले आहे.

आदेशात मुख्याधिकारी म्हणतात की, अनेकदा सभेच्या इतिवृत्तांत वेगळेच परस्पर ठराव नमूद केले जातात. ज्यावर सभेत चर्चाच झालेली नसते. अशा प्रकारामुळे पालिकेच्या एकूण कार्यपद्धतीवर तसेच कामकाजावर शंका उपस्थित केल्या जातात. त्यामुळे या सभांचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चुकीला माफी नाही! पडताळणीनंतर दोषी आढळणारे 'क्लब' कायमचे बंद करणार; CM प्रमोद सावंतांचा इशारा

Viral Video: 'कांड' करायला गेला अन् भलतचं होऊन बसलं! चिमुरड्याचा निशाणा चुकला आणि आजोबांना बसला जबरदस्त फटका; व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट

Salman Khan Goa Property: सलमान खानच्या गोव्यातील मालमत्तेवर टांगती तलवार; CRZ नियमांच्या उल्लंघनावरुन हायकोर्टात याचिका दाखल!

Horoscope: 2026 मध्ये 'या' 5 राशी होणार कर्जमुक्त; कोणाला मिळणार कुबेराचा खजिना आणि कोणाच्या खिशाला लागणार कात्री?

Vijay Hazare Trophy: अर्जुन तेंडुलकरला धु धु धुतलं! मुंबईच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजीचा घेतला समाचार; सर्फराज-यशस्वीची धमाकेदार फलंदाजी VIDEO

SCROLL FOR NEXT