Mapusa Meditation Camp Gomantak Digital Team
गोवा

Mapusa Meditation Camp : ब्रह्माकुमारीतर्फे उद्यापासून ध्यान शिबिर

21 ते 25 मेपर्यंत कार्यक्रम : लोकसंवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : प्रजापती ब्रह्माकुमारी आंतरराष्ट्रीय विश्व विद्यालय मुख्यालयातील खाद्य विभागाचे व्यवस्थापक सूरज भाईजी हे येत्या रविवार 21 ते गुरुवार 25 मे दरम्यान गोवा दौऱ्यावर येणार आहेत. म्हापशात त्यांचे ध्यान शिबिर व लोकसंवादाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती गोवा-सिंधुदुर्ग विभागाच्या संचालिका शोभा बहनजी यांनी दिली.

शुक्रवारी येथील ब्रह्माकुमारीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांच्या समवेत सुरेखा बहनजी या उपस्थित होत्या. या दौऱ्यावर सूरज भाईजी यांच्या सोबत ब्रह्माकुमारीच्या लेखिका व वक्त्या गीता बहनजी असेल.

गोवा दौऱ्यापूर्वी 21 रोजी सकाळी सूरज भाईजी वेंगुर्ला येथे ब्रह्माकुमारीच्या सुखसमाधान या कार्यालयाचे उद्‍घाटन करतील. त्यावेळी तेथील मंत्री, आमदार, नगराराध्यक्ष व प्रतिष्ठित लोक उपस्थित असतील. उद्‍घाटन सोहळ्यानंतर तेथे त्यांचा मेडीटेशनचा कार्यक्रम होईल.

त्यानंतर रात्री सूरज भाईजी त्यांचे गोव्यात आगमन होईल. सोमवार दि. 22 रोजी म्हापशातील कार्यालयात पहाटे 4 ते 4.45 दरम्यान त्यांचे मेडीटेशनचा कार्यक्रम होईल. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत ध्यान शिबिर होईल. 23 रोजी पहाटे 4 पासून ध्यानचा कार्यक्रम वेर्ला-बार्देश येथील कार्यालयात होईल.

संध्याकाळी ५ ते 7.30 वा. म्हापशातील हनुमान नाट्यगृहात ब्रह्माकुमारीच्या सकारात्मक परिवर्तन उपक्रमाअंतर्गत सूरज भाईजींचा लोकसंवादाचा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मंत्रीगणांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे, तसेच हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती शाभा बहनजी यांनी दिली.

24 रोजी ब्रह्माकुमारीच्या प्रमुखांसाठी ध्यानचे शिबिर सूरज भाई व गीता बहनजी घेतील. त्यानंतर गुरूवार 25 रोजी ते माघारी आबूधाबीला रवाना होतील, असेही शोभा बहनजी यांनी सांगितले.पाण्याच्या नियोजनाविषयी जनजागृती व आवश्यक उपक्रम या अभियानामार्फत हाती घेतले जाईल. सकारात्मक परिवर्तन या ब्रीदवाक्याच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले जात आहे, अशी माहितीही शोभा बहनजी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Life Course Immunization: हृदयरोग, मधुमेह, कर्करोगग्रस्तांना मिळणार लसीचे कवच! गोव्यात 'लाईफ-कोर्स इम्युनायझेशन 2026-2036'ची अंमलबजावणी सुरू

Greater Noida Bus Fire: डोळ्यांसमोर सगळं संपलं, प्रवाशांच्या किंकाळ्यांनी हादरला परिसर, यमुना एक्सप्रेसवेवर स्लिपर बसला भीषण आग; 9 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Electoral Roll: मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी पात्र म्हटले, पण अंतिम यादीत नावच नाही! गोव्यातील 97 प्रकरणांमुळे निवडणूक यादीच्या तांत्रिक नियंत्रणावर चर्चा

Horoscope 24 Saptember 2026: व्यवसायात भरभराट, धनलाभ आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार! ग्रहांच्या शुभ योगामुळे चमकणार 'या' राशींचे नशीब; आजचा दिवस ठरणार महत्त्वाचा

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

SCROLL FOR NEXT