Mapusa Market Nullah Cleaning Dainiak Gomantak
गोवा

म्हापसा नालेसफाईचा केवळ फार्स? पावसाळ्यापूर्वी प्रशासनाचा चालढकलपणा; नाल्यातील गाळ काठावरच ठेवल्यानं 'टुगेदर फॉर म्हापसा' संघटनेचा संताप

Mapusa Market Nullah Cleaning: पावसाळा उंबरठ्यावर असूनही म्हापसा मार्केट आणि सबयार्ड परिसरातील मुख्य नाल्याच्या सफाईबाबत प्रशासनाचा चालढकलपणा सुरूच आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: पावसाळा उंबरठ्यावर असूनही म्हापसा मार्केट आणि सबयार्ड परिसरातील मुख्य नाल्याच्या सफाईबाबत प्रशासनाचा चालढकलपणा सुरूच आहे. हे काम अपेक्षित दर्जाचे झालेले नाही. नाल्यातील गाळ काढला खरा; परंतु तो उचलून नेण्याऐवजी नाल्याच्या काठावरच ठेवल्याने पहिल्याच पावसात हा कचरा पुन्हा नाल्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘टुगेदर फॉर म्हापसा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सबयार्ड येथे पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या या निष्काळजीपणाचा पाढा वाचला. यापूर्वी संघटनेने हा विषय उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.

त्यानंतर प्रशासनाने गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. काही दिवसांपूर्वी ''टुगेदर फॉर म्हापसा''च्या सदस्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत या नाल्याची पाहणी केली होती. त्यावेळी नाल्यातील साचलेला कचरा आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे गंभीर स्वरूप समोर आले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. कडक शब्दांत टीका केली.

पावसाळ्यात हा नाला प्रवाहित होतो आणि याच मार्गाने शहरातील पावसाचे पाणी पुढे वाहून जाते. त्यामुळे हा गाळ वेळेत पूर्णपणे हटवला नाही, तर मार्केटमध्ये पूरसदृश स्थिती उदभवू शकते, अशी भीती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी ॲड. महेश राणे, जितेश कामत, विजय भिके, मेधा जाधव यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर

सार्वजनिक पैशांचा अपव्यय : राणे:

पत्रकार परिषदेत बोलताना पदाधिकारी अध्यक्ष ॲड. महेश राणे म्हणाले की, प्रशासनाने नाल्यातील गाळ बाहेर काढला आहे, पण तो तिथेच साचवून ठेवणे हा केवळ कामाचा फार्स आहे. पाऊस पडताच हा सर्व गाळ वाहून पुन्हा नाल्यात जाईल आणि नाल्याची अवस्था ''जैसे थे'' होईल. मग या सफाईवर खर्च केलेल्या सार्वजनिक पैशांचा उपयोग काय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘ड्रेनेज प्लॅन’ राबवा : कामत

जितेश कामत यांनी मागणी केली की, नाल्याकाठी काढून ठेवलेला गाळ आणि कचरा तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावा. केवळ वरवरची सफाई करून प्रश्न सुटणार नाही, तर या नाल्याचे बांधकाम शास्त्रोक्त पद्धतीने करून तो पक्का बांधला जावा. तसेच पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी सबयार्ड परिसरात ‘ड्रेनेज प्लॅन’ राबवावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT