Cleaning Hacks: फ्रीजमधील व्हेजिटेबल ट्रे स्वच्छ करण्यासाठी वापरा 'या' हॅक्स

Cleaning Hacks: फ्रीजमधील व्हेजिटेबल ट्रे स्वच्छ करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर करावा हे जाणून घेऊया.
Cleaning Hacks
Cleaning HacksDainik Gomantak
Published on
Updated on

Cleaning Hacks how to clean fridge vegetable storage box read full story

आजकाल सर्वांकडे फ्रीज वापरला जातो. फ्रीज स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा आपण फ्रीजच्या बाहेरील भाग स्वच्छ करतो. पण फ्रीज आतून नीट स्वच्छ करणे देखील गरजेचे असते. फ्रीजरमध्ये असलेला व्हेजिटेबल ट्रे पुढील हॅकच्या मदतीने स्वच्छ करू शकता.

फ्रीज रिकामा करावा

सर्वात पहिले तुम्हाला फ्रीज रिकामा करावा लागेल. फ्रीजमधून सर्व गोष्टी बाहेर काढाव्या लागतील. याआधी तुम्हाला फ्रीजचा प्लग स्विच बोर्ड काढून टाकावा लागेल. मग दारातील डब्यात जे काही ठेवले आहे ते रिकामे करा.

व्हेजिटेबल ट्रे स्वच्छ करणे गरजेचे

व्हेजिटेबल ट्रे सर्वात घाण असते. आपण व्हेजिटेबल ट्रेमध्ये अनेक भाज्या आणि फळे एकत्र ठेवतो. भाजीपाल्याचे पाणीही व्हेजिटेबल ट्रेमध्येच राहते. यामुळे खालच्या भाज्या खराब होऊ लागतात. आठवड्यातून दोनदा ते स्वच्छ करणे आवश्यक आहे.

स्वच्छ करताना काय करावे

सर्वात पहिले व्हेजिटेबल ट्रे रिकामे करावे.

यानंतर तुम्हाला भाजीची टोपली कोमट पाण्याने धुवावी लागेल.

मग तुम्हाला लिक्विड डिटर्जंटचे काही थेंब घालावे लागतील.

यानंतर, ब्रशच्या मदतीने संपूर्ण व्हेजिटेबल ट्रे स्वच्छ करा.

यानंतर व्हेजिटेबल ट्रे सामान्य पाण्याने धुवावे.

नंतर व्हेजिटेबल ट्रे कापडाने स्वच्छ पुसावा.

ते कोरडे झाल्यानंतर त्यात भाज्या ठेवू शकता.

या गोष्टींची घ्या काळजी

व्हेजिटेबल ट्रेमध्ये सरवात खाली वजनदार भाज्या ठेवाव्या. त्याच्यावर पालेभाज्या ठेवाव्या. यामुळे पालेभाज्या लवकर खराब होत नाहीत. व्हेजिटेबल ट्रेमध्ये फळं चुकूनही ठेवू नयका. फळं आणि भाज्या वेगळ्या ठेवल्या तरच खराब होणार नाही. भाज्यांमुळे फळेही खराब होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com