Mapusa Market Chor Bazar Viral Video News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market News: म्हापसा मार्केटला चोर संबोधणाऱ्या 'त्या' युवकाने मागितली माफी; म्हणाला...

व्हिडिओ मालकावर गुन्हा दाखल करण्याची म्हापसा व्यापारी संघटनेतर्फे मागणी; युवकाने मागितली माफी

Kavya Powar

Mapusa Market Chor Bazar Viral Video News: म्हापसा मार्केटला 'चोर बाझार' असे संबोधणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. याबाबत मार्केटची बदनामी केल्याबद्दल व्हिडिओ मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हापसा व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आली होती. यासंदर्भात व्हिडिओ बनवणाऱ्या युवकाला काल (सोमवार, 11 डिसेंबर) म्हापसा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतले.

संपूर्ण प्रकरण असे की, साधारण दोन महिन्यापूर्वी कळंगुटमधील अशोक भाटी (22) या युवकाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हापसा मार्केटबद्दल आक्षेपार्ह माहिती पसरवणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो हे मार्केट गोव्याचे 'चोर बाझार' असल्याचे सांगत होता.

तो व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओ प्रकाशित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत आणि सचिव सिद्धेश राऊत यांनी म्हापसा पोलिसांना केली.

दरम्यान, काल अशोक भाटी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. नकळत आपण हा व्हिडिओ बनवला असून, पुन्हा अशी चूक करणार नसल्याचे अशोक भाटी याने सर्वांसमोर मान्य केले. तसेच तो व्हिडिओ आपल्या अकाउंटवरून डिलिट करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला समज देऊन पुन्हा असे कोणतेच कृत्य न करण्याची ताकीद देऊन सोडून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT