पणजी: युक्रेन-रशिया युद्धाने संपुर्ण देशात एकच खळबळ माजली आहे. युद्ध अजुनही सुरु असुन, कझाकस्तनला जाणारे चार्टर एक आठवड्यापर्यंत कमी करण्यात आले आहेत, जेव्हा गोव्यातील अपेक्षित पर्यटन, युद्धाच्या भविष्यात युद्ध संपले नाही तर गोव्यामधील अपेक्षित पर्यटन कमी होण्याची शक्याता नाकारता येत नाही. (Ukrain-Russia war Impact on Goa Tourism)
पर्यटन संचालक मेनिनो डिसोझा यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट केले की, रशिया-युक्रेन युद्ध केवळ राज्यातील पर्यटन व्यापारावरच नव्हे तर गोव्यातील अर्थव्यवस्थेवरही भविष्यात परिणाम करेल.
ते पुढे म्हणाले "युद्धापूर्वीही चार्टर रद्द करण्याचा प्रयत्न केला होता. रशियातील (Russia) नागरीकांचा गोव्यातील (Goa) परदेशी पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे, जर फ्लाइट रद्द केले तर पर्यटन संख्या घटेल असे ते म्हणाले. दरम्यान, डिसोझा पुढे म्हणाले की, राज्यातील हॉटेल इंडस्ट्रीने (Hotel Industry) हॉटेल्ससाठी 50% उपस्थीतीचे निर्बंध कमी करण्यासाठी सरकारला विनंती केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.