Mapusa Junction Dainik Gomantak
गोवा

पेडे जंक्शन ठरतेय 'जीवघेणे'

सूचनाफलकही नाहीत: पादचारी, वाहनचालकांनाही त्रासदायक

दैनिक गोमन्तक

म्हापसा: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर म्हापशातील पेडे येथील जंक्शन पादचाऱ्यांबरोबरच वाहनचालकांच्या दृष्टीने जीवघेणे तथा त्रासदायक बनलेले आहे. काही मूलभूत सुविधांचे निर्माण त्या ठिकाणी करण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याने या अपघातप्रवण क्षेत्रात अनेकविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. हल्लीच्या काळात तिथे कित्येक अपघात झालेले आहेत.

गेल्या सुमारे चार दिवसांत त्या ठिकाणी तीन-चार वाहन अपघात घडलेले आहेत. त्या भागात गतिरोधक अथवा सूचनाफलकांची पुरेशी सोय केली नसल्याने भरधाव गतीने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होत आहेत. राष्ट्रीय महामार्गाचा हा भाग गेल्या सुमारे चार महिन्यांपासून खुला केल्यापासून तेथील वाहतूक वाढलेली आहे व त्यामुळेच तिथे कित्येक अपघात होत आहेत. त्या ठिकाणी सध्या दरदिवशी किमान एक लहान-मोठा अपघात होत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

म्हापशातील नागरिक शेखर नाईक म्हणाले, या जंक्शनच्या ठिकाणी सुमारे आठ रस्त्यांवरून येणारे लोक एकत्रित होतात. परंतु, त्यांना हा महामार्ग पार करणे जीवघेणे ठरलेले आहे. तसेच तेथील सर्व्हिस रोडही अतिशय कमी रुंदीचा आहे.

म्हापसा येथील वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बाब भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्या जंक्शनच्या ठिकाणी वाहनचालकांना भेडसावणाऱ्या समस्याही त्यांनी प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यासंदर्भात कोणत्या उपाययोजना घेतल्या जाऊ शकतात, त्याबाबतच्या सूचनाही वाहतूक विभागाने प्राधिकरणाला केल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्गाचे साहाय्यक अभियंता दिनेश तार यांनी यासंदर्भात स्पष्ट केले आहे, की या जंक्शनच्या ठिकाणी उद्‍भवणाऱ्या समस्यांची आम्हाला जाणीव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

SCROLL FOR NEXT