Court Dainik Gomantak
गोवा

JMFC On Vagator Nightclub Attack: वागातोर नाईट क्लबमधील हल्ल्याची डायरीतील नोंद सादर करा

म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचे हणजुण पोलिसांना निर्देश

Akshay Nirmale

JMFC On Vagator Nightclub Attack: वागातोर येथील नाईट क्लब 'राईथ'मध्ये 12 नोव्हेंबर रोजी सुमारे दहा कर्मचाऱ्यांनी अनिश आणि आदित्य वार्ष्णेई या दोन भावांवर केलेल्या भीषण हल्ल्याच्या तपासाशी संबंधित केस डायरी सादर करा, असे निर्देश म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) अश्विनी खांडोलकर यांनी हणजूण पोलिसांना दिले आहेत.

वार्ष्णेई बंधूंचे वकिल अॅड. आयरीस रॉड्रिग्स यांनी पोलिस तपास करत नाहीत, आरोपींना संरक्षण देत आहेत, असा आरोप केला होता. त्यानंतर न्यायालयाने याबाबत निर्देश दिले आहेत.

जेएमएफसीकडे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, 13 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 च्या सुमारास पोलिसांकडे तोंडी तक्रार केली होती त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता नाईट क्लबच्या कर्मचार्‍यांविरुद्ध त्या भीषण हल्ल्याबद्दल लेखी तक्रार करण्यात आली होती. 14 नोव्हेंबर 2022 रोजी 19.47 वाजता दहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एका भावाच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून त्याचा एक डोळा देखील गमावला होता, असेही याचिकेत म्हटले होते.

तपास अधिकारी पीएसआय फ्रान्सिस्को झेवियर यांच्या जबाबात म्हटले आहे की, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपी विनय तुपकरला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

हणजुण पोलिसांना या प्रकरणाचा योग्य तपास करण्याचे निर्देश द्यावेत आणि आरोपी प्रभावशाली असल्याने न्यायालयाने तपासावर लक्ष ठेवावे, असेही मारहाण झालेल्या भावांच्या याचिकेत म्हटले आहे. न्यायालय 7 डिसेंबर रोजी युक्तिवाद ऐकणार आहे. पोलिसांना या प्रकरणाच्या तपासाचा साप्ताहिक स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT