Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले 30 लाख; तरुणीकडून तक्रार दाखल

Goa Crime News: चांगली नोकरी देण्‍याचे आमिष दाखवून म्‍हापसा येथील एका युवतीवर दोनापावला येथील युवकाने लैंगिक अत्‍याचार केल्‍याची तक्रार मडगाव पोलिसांत वर्ग करण्‍यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: चांगली नोकरी देण्‍याचे आमिष दाखवून म्‍हापसा येथील एका युवतीवर दोनापावला येथील युवकाने लैंगिक अत्‍याचार केल्‍याची तक्रार मडगाव पोलिसांत वर्ग करण्‍यात आली आहे. सदर युवकाने त्‍या कृत्‍याचा व्‍हिडिओ काढून नंतर तो व्‍हायरल करण्‍याची धमकी देऊन आपल्‍याला ब्‍लॅकमेल केल्‍याचे युवतीने तक्रारीत म्‍हटले आहे. तसेच ब्‍लॅकमेल करून आपल्‍याकडून त्‍या युवकाने सुमारे ३० ते ४० लाख रुपये उकळले असेही तक्रारीत म्‍हटले आहे.

वास्‍तविक ही तक्रार म्‍हापसा पोलिसांत दिली होती. मात्र लैंगिक अत्‍याचाराची घटना मडगावात घडल्‍याने म्‍हापसा पोलिसांनी ही तक्रार मडगाव पोलिसांकडे वर्ग केली. यासंदर्भात मडगावचे पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्‍याशी संपर्क साधला असता, पीडित युवतीची जबानी नोंद करून घेतल्‍यानंतरच तपासाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे त्‍यांनी सांगितले.

दरम्‍यान, या युवतीची केस पोलिसांसमोर आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्‍हो यांनी आज त्‍या युवतीच्‍या वडिलांसह मडगाव पोलिस स्‍थानकाला भेट दिली आणि व्‍यथा मांडली. वास्‍तविक याप्रकरणी म्‍हापसा पोलिसांनीच गुन्‍हा नोंद करणे आवश्‍‍यक होते. तेथे एफआयआर नोंद केल्‍यानंतर तक्रार मडगावात वर्ग केली पाहिजे होती.

मात्र म्‍हापसा पोलिसांनी आपले कर्तव्‍य योग्‍य प्रकारे पार पाडले नाही. आता तरी पोलिसांनी तातडीने पावले उचलावीत, असे सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्‍हो म्हणाल्या. दरम्यान, यासंदर्भात आमच्‍याकडे तक्रार आलेली आहे. मात्र, अत्‍याचाराची घटना नेमकी कोठे घडली याची माहिती जाणून घेण्‍यासाठी पीडित युवतीची अगोदर जबानी नोंद केली जाईल. त्‍यानंतरच पुढील कारवाई करण्‍यात येईल, असे मडगावचे पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांनी सांगितले.

पीडित मुलीने तक्रारीत काय म्‍हटले आहे?

तक्रारीत नोंद केल्‍यानुसार, पीडित युवती ही इव्‍हेंटमध्‍ये काम करते. म्‍हापसा येथील एका युवकाने तिची गाठ दोनापावला येथील त्‍या युवकाशी घालून दिली.

आपल्‍याकडे काम केल्‍यास तुला लाखो रुपयांचा मोबदला मिळेल, असे सांगून त्‍या युवकाने तिला मडगावात आणले. तसेच तिला कपडे काढायला लावून तिचा व्‍हिडिओ काढला.

कामाचा भाग म्‍हणून हा व्‍हिडिओ काढला असल्‍याचे तिला सुरुवातीला सांगण्‍यात आले. मात्र त्‍यानंतर हा व्‍हिडिओ व्‍हायरल केला जाईल असे सांगून त्‍या युवकाने आपल्‍याला ब्‍लॅकमेल करण्‍यास सुरुवात केली असे युवतीने तक्रारीत म्‍हटले आहे.

शिवाय त्‍या युवकाने आपल्‍याला अन्‍य मुलींना कामासाठी आणण्‍यास भाग पाडले. या मुलींकडून त्‍याने सुरुवातीला शुल्‍क म्‍हणून साडेसात हजार रुपये वसूल केले.

त्‍यानंतरही त्‍याने आपल्‍याला आणखी मुली कामासाठी आण असे सांगून धमकावले. आपण आणखी मुली आणू शकत नसल्‍यामुळे त्‍याने आपल्‍याकडे पैसे मागण्‍यास सुरुवात केली.

यादरम्‍यान आपल्‍याला मडगाव येथील फ्‍लॅटवर आणून लैंगिक अत्‍याचार केले. आतापर्यंत आपल्‍याकडून या युवकाने ३० ते ४० लाख रुपये उकळले असल्‍याचे युवतीने तक्रारीत म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाकड्यांचा गेम होणार? पल्लेकेलेत पावसाचे काळे ढग; 'वरुणराजा' पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवणार? जाणून घ्या Weather Report

अडवईतील फुलासारियो डोंगरावर आग, काजू बागायती खाक; 10 उत्पादकांना बसला आर्थिक फटका

'किंग कोब्रां'चा होतो रेल्वेतून गोव्यात प्रवास! संशोधनातून धक्कादायक माहिती

Israel Attack On Iran: क्षेपणास्त्रांचा मारा अन् सायरनचा आवाज...! इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; बॅलिस्टिक मिसाइल्सनी हादरलं 'तेहरान' VIDEO

गोवा विधानसभा निवडणुकीची धग अन् आंदोलनांचा वणवा; सरकारसाठी धोक्याची घंटा? - संपादकीय

SCROLL FOR NEXT