Sonali Phogat |Goa News Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case: सोनाली फोगट हत्या प्रकरणात मोठी अपडेट, केस आता सत्र न्यायालयाकडे वर्ग

सोनाली फोगट यांचा 23 ऑगस्ट रोजी गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Sonali Phogat Case: भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांच्या कथित हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 डिसेंबरला होणार आहे. म्हापसा जीएमएफसी (Mapusa JMFC) कोर्टाने हे हत्या प्रकरण आता जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. सोनाली फोगट यांचा 23 ऑगस्ट रोजी गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला होता.

सीबीआयने फोगट हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रासोबत इतर काही कागदपत्रे (सीसीटीव्ही फुटेज दस्ताऐवज) जोडली आहेत. ही कागदपत्रे आम्हास उपलब्ध करावीत, असा अर्ज संशयितांच्या वकिलांनी वरील जीएमएफसीसमोर केला होता. हा अर्ज संबंधितांकडून शुक्रवारी मागे घेण्यात आला. शुक्रवारी (ता.16) सकाळच्या सत्रात जीएमएफसी कोर्टात हे प्रकरण सुनावणी आले, यावेळी सीबीआयने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील हजर होते. त्याचप्रमाणे संशयित सुधीर सांगवान व संशयित सुखविंदर पाल सिंग यांना कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून आज न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.

मागील 05 डिसेंबरच्या सुनावणीवेळी दोघेही संशयित अनुपस्थित होते.दरम्यान, सोनाली फोगट हत्याप्रकरणी त्यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि सहकारी सुखविंदर पाल सिंग यांना 25 ऑगस्टला गोवा पोलिसांनी अटक केली होती. सध्या हे दोघेही संशयित कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. गोवा पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास हा सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) केला जात आहे. सीबीआयने सोनाली फोगट हत्याप्रकरणी न्यायालयात 2,500 पेक्षा जास्त पानी आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये 104 साक्षीदार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT