Mapusa Fire Incident Dainik Gomantak
गोवा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Mapusa Fire News: उपलब्ध माहितीनुसार, शुभांगी आसोलकर आणि एक मुलगी घरात असताना अचानक आग लागली. यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले आणि म्हापसा अग्निशमन दलाला याची माहिती दिली.

Sameer Panditrao

म्हापसा: डांगी कॉलनी, म्हापसा येथे शुभांगी आसोलकर (वय ७० वर्षे) यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना शनिवारी (ता.२६) रात्री ८ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ३ लाख रुपयांचे नुकसान झाले.

उपलब्ध माहितीनुसार, शुभांगी आसोलकर आणि एक मुलगी घरात असताना अचानक आग लागली. यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले आणि म्हापसा अग्निशमन दलाला याची माहिती दिली. दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले.

या दुर्घटनेत इलेक्ट्रॉनिक साहित्य, धान्यसाठा, कपडे व इतर मौल्यवान साहित्य जळाले. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रकाश कान्नाईक, फायर फायटर दीप्तेश गावडे, श्रीनाथ नर्से, प्रकाश घाडी, प्रवीण नाईक गावकर आणि चालक जयेश कानोळकर यांनी बचावकार्यात सहभाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold price in India: नवा उच्चांक! सोन्याचे भाव भिडले गगनाला, चांदीही तेजीत; ताजे दर जाणून घ्या..

Ganesh Idol: आजी-आजोबा 'हो' म्हणाले, छोट्या अस्मीने स्वतःच बनवली 'गणेशमूर्ती'; पारंपरिक मातीच्या मूर्तींची जागरूकता

Anmod Ghat: अनमोड रस्त्याबाबत नवी अपडेट! 15 सप्टेंबरपासून होणार खुला; उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Shramdham Yojana: 2012 साली पर्रीकरांनी मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती दिली, निराधारांसाठी श्रमधाम योजना राबवणारे 'तवडकर'

Mungul Crime: मुंगुल गँगवॉरमधील अनेकजण भूमीगत! मटका एजंटचा सहभाग उघड; पोलिसांना सापडले महत्त्वाचे धागेदोरे

SCROLL FOR NEXT