Hit & Run Case  Dainik Gomantak
गोवा

Hit & Run Case : घाेगळ येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पत्रकार जखमी

Mapusa Hit and Run Case : हा प्रकार काहीसा संशयास्‍पद स्‍वरूपाचा हाेता, असा दावा रॉड्रीगीस यांनी केला असून कदाचित यामागे घातपाताचा प्रकार तर नसावा ना अशी शंका व्‍यक्‍त केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्‍यात अपघातांची संख्‍या वाढलेली असतानाच पत्रकार सावियो राॅड्रीगीस यांनाही काल एका कारने धडक देऊन कारचालकाने तेथून पळ काढला.

हा प्रकार काहीसा संशयास्‍पद स्‍वरूपाचा हाेता, असा दावा रॉड्रीगीस यांनी केला असून कदाचित यामागे घातपाताचा प्रकार तर नसावा ना अशी शंका व्‍यक्‍त केली आहे.

सावियो रॉड्रीगीस हे ‘गाेवा क्रोनिकल’ ही आपली व्‍हेबसाईट चालवितात. काल सकाळी आपल्‍या मुलीला चाैगुले महाविद्यालयात सोडून ते परतत असताना घाेगळ येथील मारुती मंदिराजवळ हा अपघात घडला.

राॅड्रीगीस यांनी सांगितले, की आपल्‍या दिशेने कार येत असल्‍याचे पाहिल्‍यावर आपण आपली दुचाकी थांबवली. त्‍यावेळी ती कारही थांबली. कदाचित आपल्‍याला पुढे जा असा त्‍या कारचालकाचा इशारा असेल असे समजून आपण दुचाकी सुरू केली. त्‍याचवेळी त्यानेही आपली गाडी सुरू करून आपल्‍या दुचाकीला धक्‍का दिला. त्‍या धक्‍क्‍याने आपण खाली पडलो. मात्र, आपली कुठलीही मदत न करता ताे कारचालक पळून गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT