Mapusa Gomantak Digital Team
गोवा

Mapusa Parking : म्हापसा सरकारी संकुलात पार्किंगचा तिढा सुटला!

अधिकाऱ्यांचा तोडगा यशस्वी : शिस्तबद्धपणे वाहने लावली जातात आरक्षित केलेल्या जागेतच !

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : येथील सरकारी संकुलाच्या आवारात पार्किंगचा व वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, चार दिवसांपासून यावर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. त्यात अधिकारी यशस्वी होताना दिसताहेत. सध्या संकुल परिसरात वाहनांची शिस्त दिसून येत आहे. वाहने चिन्हांकित केलेल्या जागेत शिस्तबद्ध व रांगेत लागलेली दिसत असल्याने येथे कामानिमित्त येणाऱ्यांकडून अधिकाऱ्यांचे कौुतक होत आहे.

बार्देश तालुक्यातील म्हापसा शहर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मरड येथे ही सरकारी संकुल इमारत आहे. येथे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, टीसीपी, महसूल, बीडीओ, नागरी-पुरवठा तसेच इतर महत्वाची प्रशासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे इथे लोकांची बरीच वर्दळ असते. मात्र, पार्किंगच्या मर्यादित जागेमुळे अनेकजण बेशिस्तपणे वाहने पार्क करायचे. काहीवेळा चालकांत बाचाबाची व वाद व्हायचे.

बहुतांशवेळा वाहनधारक पार्क वाहनांच्या मागेच दुसरे वाहन उभे करायचे. त्यामुळे इतरांना ताटकळत उभे राहावे लागायचे. याचा फटका अनेकदा उपजिल्हाधिकारी यांच्यापासून मामलेदारांनाही बसला होता. त्यामुळेच या अवैध पार्किंगची दखल घेत यात शिस्त आणण्याचे उपजिल्हाधिकारी कार्यालयाने ठरविले. त्यानुसार, गेल्या रविवारीच पार्किंगच्या जागा चिन्हांकित करीत सोमवारपासून या पार्किंग जागेत वाहने उभी करण्यास सांगितले जात आहे. यासाठी संकुल आवारात सुरक्षा रक्षकांकडून वाहने व्यवस्थित लावून घेतली जात आहेत.

कर्मचाऱ्यांना मासिक पास

उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून सध्या संकुलातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना पार्किंग पास दिले आहेत. तर, संकुलात कामानिमित्त येणारे वकील व इतर अभ्यागतांनी आपण कुठल्या कार्यालयात आलो, हे सांगितल्यानंतर होमगार्डकडून वाहनांसह प्रवेश दिला जातोय. त्याचप्रमाणे, पार्किंगच्या जागा भरल्यानंतर वाहने बाहेरच पार्क करून येण्यास सूचविले जात आहे. त्यामुळे पार्किंगमुळे उडणारा बोजवारा सध्या बंद झालेला दिसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT