Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मजूर का तस्कर? म्हापशात संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीच्या पिशवीत सापडले 4 किलोचे अमली पदार्थ

Mapusa Crime News: राज्यात सध्या पर्यटन मोसम सुरू असल्याने नाताळ व नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गुन्हे अन्वेषण शाखेने (क्राईम ब्रँच) मध्यरात्रीच्या सुमारास मरड-म्हापसा येथील पार्किंगच्या जागेत छापा टाकून मजुराचे काम करणारा डोंगरी-वास्को येथील संशयित श्‍याम चव्हाण (२२) याला अटक केली. त्याच्याकडून ४ किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे. त्याची स्कूटरही ताब्यात घेण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मरड येथील एका बार अॅण्ड रेस्टॉरंटजवळील पार्किंग परिसरात एक व्यक्ती रात्री उशिरा संशयास्पद फिरताना दिसून आला. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्याची चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही.

त्यामुळे त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली असता त्यामध्ये गडद हिरव्या रंगाची लहान फळे आढळून आली. ती फळे गांजाची असल्याचे प्रथमदर्शनी तपासणीत निष्पन्न झाले. त्याने हा गांजा विक्रीसाठी आला होता मात्र त्याने तो कोठून आला याची माहिती उघड केली नाही.

पोलिसांची करडी नजर

राज्यात सध्या पर्यटन मोसम सुरू असल्याने नाताळ व नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे काही किरकोळ ड्रग्ज विक्रेते तसेच माफियाही सक्रिय झाले आहेत.

पार्किंग क्षेत्र तसेच काही रेस्टॉरंट व पब्सच्या बाहेर ड्रग्ज व्रिकेते फिरत असल्याने त्यांच्या नजर ठेवण्यासाठी जिल्हा, क्राईम ब्रँच तसेच अमलीपदार्थविरोधी कक्षाच्या विविध पथके स्थापन करून ती किनारपट्टीत पाळत ठेवून आहेत. विदेशी नागरिकांवरही पोलिस पथकांनी लक्ष केंद्रित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: बाईक रेंट कमी, शॅक उभारणी! गोव्‍यासमोर महाराष्‍ट्र, कर्नाटकचे आव्‍हान; पर्यटनक्षेत्रात वाढली स्पर्धा

Goa Police: नोटीस न देता बेकायदेशीर अटक, पर्वरीतील 2 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई; पीडितास नुकसानभरपाई देण्याचा आदेश

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? नवरात्रीच्या उत्साहावर सावट; गोवा, महाराष्ट्रात मुसळधार शक्य

Vishwajit Rane: 'प्रतापसिंह राणेंमुळेच राज्याचा खरा विकास'! आरोग्यमंत्र्यांचे प्रतिपादन; वडीलांच्या आठवणी सांगताना झाले भावुक

Goa AAP: ‘भाजपचा गुंडाराज गोव्यास नको’! आप राज्यभर राबवणार मोहिम; पालेकरांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT