Mapusa Garbage Problem Dainik Gomantak
गोवा

Mapusa Garbage Issue: कामगार इतके मग कचरा उचल का होत नाही? म्हापसा पालिका अधिकारी करतात काय?

Mapusa Waste Problem: नगरसेविका शुभांगी वायंगणकर यांनी कचऱ्यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेसंदर्भात अनेक प्रश्न विचारले

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Waste Issue

बार्देश: म्हापसा पालिका क्षेत्रातील कचऱ्यासंबंधी सोमवारी दैनिक ‘गोमन्तक’मध्ये ‘उचल होत नसल्याने कचरा पडून’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका शुभांगी वायंगणकर म्हणाल्या की, पालिकेकडे कचरा उचल करणारे बरेच कामगार आहेत. तरीही हा कचरा वेळेवर उचलला जात नाही. मग विद्यमान नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अभियंते, सुपरवायझर करतात तरी काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

याविषयी विद्यमान नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर म्हणाल्या की, शुभांगी वायंगणकर या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांनी कचऱ्यासंबंधी व्यवस्थित आढावा घ्यावा. नगराध्यक्ष पदावरून बाजूला झाल्यावर उगाच भलते आरोप करू नयेत. प्रत्येक नगरसेवक हे त्या प्रभागाचे प्रतिनिधी असतात. वायंगणकर या जबाबदार नगरसेविका आहेत. सत्ताधारी गटात असूनही उगाच दुसऱ्याकडे बोट दाखविणे योग्य नव्हे. कचरा उचल करणारी गाडी दिवसाला एकाच प्रभागामध्ये १०-१५ वेळा येणार नाही.

पालिका मार्केट मंडळाचे चेअरमन साईनाथ राऊळ म्हणाले की, मार्केटमधील कचरा रात्री, सकाळी, संध्याकाळी काढला जातो. परंतु भाजी व मासळी मार्केटच्या मधोमध जास्त कचरा साठतो. कचरा काढल्यानंतर व्यापारी पुन्हा तेथे कचरा टाकतात. वारंवार सांगूनही ते ऐकत नाहीत.

सुपरवायझरचे दुर्लक्ष

पालिकेने कचरा उचल करण्यासाठी ३ ट्रक भाडेपट्टीवर दिवसा दहा हजार रुपये बोलीवर घेतले आहेत. एक ट्रक दिवसाला चार फेऱ्या मारतो. पण कंत्राटदार आणि अभियंता त्याकडे लक्ष देत नाहीत. बऱ्याचदा ते ट्रक अर्धाच भरतात आणि तसेच निघून जातात. कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट होत नाही. कचरा उचलण्यासाठी म्हापसा पालिका लाखो रुपये खर्च करते. मग सुपरवायझर करतात तरी काय, असाही प्रश्न वायंगणकर यांनी उपस्थित केला.

कारकुनाला जुंपले ‘इनवर्ड’ला

कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारकून नाही. उपलब्ध कारकुनाला पालिकेत ‘इनवर्ड’साठी बसविलेे आहे. त्यावर नियंत्रण कोण ठेवणार, असेही वायंगणकर म्हणाल्या.

शुभांगी वायंगणकर यापूर्वी नगराध्यक्षा होत्या. आताही नगरसेविका असल्याने त्यांचीही तेवढीच जबाबदारी आहे. कचराप्रश्‍नी पालिकेचे अधिकारी तसेच अभियंते त्यांची कामे व्यवस्थित करतात. उगाच कुणावरही नाहक आरोप करू नयेत.
डॉ. नूतन बिचोलकर, नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT