म्हापसा: दिवाळीच्या दिवशी म्हापसा शहरात घडलेल्या चार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयिताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयित हा स्वतः फेरीवाला असून, पीडितेचे वडील आणि अन्य फेरीवाले दारूच्या नशेत झोपल्याची संधी साधून त्याने चिमुरडीला पळवून नेल्याचे तपासात उघड झाले आहे.
संशयित गोव्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी रेल्वे स्थानकांसह आंतरराज्य तपासणी नाक्यांवर सतर्कता वाढवली आहे. त्याच्या शोधासाठी विशेष पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.
पीडित बालिकेचे वडील दोन दिवसांपूर्वीच तिला घेऊन म्हापसा बाजारात आले होते. ते अन्य फेरीवाल्यांसोबत बाजारातील पदपथावर रात्री झोपत असत. घटनेच्या दिवशी वडिलांनी अन्य फेरीवाल्यांसोबत अतिप्रमाणात मद्यपान केले होते.
पळून जाण्याचे मार्ग रोखण्यासाठी नाकाबंदी
संशयित गोव्याबाहेर पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, प्रमुख बसस्थानके आणि आंतरराज्य तपासणी नाक्यांवरील सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयिताच्या अटकेसाठी विशेष पोलिस पथके विविध ठिकाणी शोध घेत आहेत.
त्यामुळे ते नशेत पदपथावर झोपले होते. वडील झोपल्याने बालिका एकटीच रडत बसली होती. याच संधीचा फायदा घेत शेजारी झोपणाऱ्या ३५ ते ४० वर्षे वयोगटातील संशयित फेरीवाल्याने बालिकेला पदपथावरून उचलून नेले व टॅक्सीस्थानकाजवळील एका जुन्या व जीर्ण इमारतीच्या तळमजल्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला.दरम्यान, विवस्त्र आणि रक्तबंबाळ अवस्थेतील बालिका वेदनेने आक्रोश करत रस्त्यावर आली. मोटारसायकल स्टँडवरील पायलट आणि स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हापसा पोलिसांनी तपासाला वेग दिला. पीडितेचे वडील तसेच बाजारातील अन्य फेरीवाल्यांचे जबाब नोंदवून संशयिताची ओळख निश्चित करण्यात आली. विशेष पथकांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.