Woman detained Mapusa Dainik Gomantak
गोवा

अपमानास्पद भाषा, ईदच्या सजावटीची नासधूस, एकता नगरात तणाव; पोलिसांनी महिलेला घेतलं ताब्यात

Mapusa Eid decoration vandalism: या महिलेने वारंवार गैरवर्तन करून मुस्लिम समाजातील सदस्यांना अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप आहे

Akshata Chhatre

म्हापसा: म्हापसा येथील एकता नगर परिसरात एका महिलेच्या कथित गैरवर्तनामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या महिलेने वारंवार गैरवर्तन करून मुस्लिम समाजातील सदस्यांना अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप आहे. ही बाब अधिक गंभीर तेव्हा झाली, जेव्हा तिने ईदच्या सणानिमित्त लावलेली सजावटही तोडल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला.

या घटनेमुळे संतापलेल्या मुस्लिम समाजातील सदस्यांनी संबंधित महिलेला तत्काळ अटक करण्याची मागणी करत तिच्या घरासमोर गर्दी केली. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

पुढील घडामोडींमध्ये, पोलिसांनी संबंधित महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच, मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी म्हापसा पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आणि महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस ठाण्याबाहेर आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रेषित मुहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट

मुस्लिम धर्मगुरूंच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी साखळी येथील मुस्लिम बांधवांनी डिचोली पोलीस ठाण्यावर धडक दिली. या सोबतच या प्रकरणी पणजी पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'प्रमोद सावंतांमध्ये रोखण्याची हिम्मत नाही', जमिनीचा मालकी हक्क देण्याचा केजरीवालांनी 'मये'वासीयांना केला वायदा

Goa Crime: सुर्ला येथे फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

Rohit Sharma Captaincy: "आम्हाला युवा खेळाडूंना संधी द्यायचीय", रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढलं? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

'अमित पाटकरांची खाण प्रमोद सावंतांच्या आशिर्वादाने सुरुये, दोघेही गोमंतकीयांना मूर्ख बनवतायेत'; अरविंद केजरीवाल

रश्मीका-विजयने गुपचूप उरकला साखरपूडा; दोन महिन्यात होणार 'शुभमंगल सावधान'!

SCROLL FOR NEXT