Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case: मामलेदार राहूल देसाईसह मैथी, वझरकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी

म्हापसा न्यायालयाचा निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

Land Grabbing Case: गोव्यातील जमीन हडप प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मामलेदार राहूल देसाई, राजकुमार मैथी आणि योगेश वझरकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित आरोपींना आज म्हापसा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयात ( mapusa judicial magistrate first class) सादर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत.

बार्देश तालुक्यातील जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड यांच्याशी लागेबांधे असलेला बार्देशचा तत्कालीन आणि मुरगावचा विद्यमान मामलेदार राहूल देसाई (Rahul Desai) याला एसआयटीने गुरूवारी रात्री अटक केली. देसाई विरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरूवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक केली.

तसेच, जमीन हडप प्रकरणात राजकुमार मैथी (Rajkumar Maithi) याला चौथ्यांदा अटक करण्यात आली. दोन दिवसांपुर्वीच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. राहुल देसाईच्या कार्यालयातील चालक योगेश वझऱकर (Yogesh Wazarkar) याला देखील एसआयटीने अटक केली. एसआयटीने जमीन हडप प्रकरणात आत्तापर्यंत चार सरकारी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

दरम्यान, मामलेदार राहूल देसाईसह मैथी, वझरकर यांना म्हापसा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT