Goa Theft Dainiak Gomantak
गोवा

Goa Theft: चोरट्यांचा सिनेस्टाईल डाव; म्हापशातील तीन कार्यालयांतून रोकड आणि साहित्य चोरी, मध्यरात्री साधली संधी

Mapusa Cosmos Center Theft: शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘कॉसमॉस सेंटर’मध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. या घटनेत तीन कार्यालये लक्ष्य करत सुमारे १५ हजार रुपयांची रोकड आणि इतर साहित्य लंपास करण्यात आले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘कॉसमॉस सेंटर’मध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. या घटनेत तीन कार्यालये लक्ष्य करत सुमारे १५ हजार रुपयांची रोकड आणि इतर साहित्य लंपास करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी इमारतीच्या खिडकीची कडा वाकवून तसेच दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. विकेश हसोटीकर आणि प्रवीण शेट यांच्या मालकीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग व मार्केटिंग कार्यालयात ही चोरी घडली.

सकाळी कार्यालय उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. चोरट्यांनी हसोटीकर यांच्या दोन कार्यालयांना आणि शेट यांच्या एका कार्यालयाला लक्ष्य केले. विशेषतः हसोटीकर यांच्या कार्यालयातील ड्रॉवरमधील रोकड लंपास करण्यात आली. ही सर्व कार्यालये एकमेकांच्या शेजारी असल्याने चोरट्यांनी सलग तीन ठिकाणी हात साफ केल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे म्हापसा शहरातील व्यापाऱ्यांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

खरी कुजबुज: कलियुगातील 'लव-कुश'

SCROLL FOR NEXT