Mapusa Traffic Signal Gomantak Digital Team
गोवा

Traffic Signal : म्हापसा शहरात 5 ठिकाणी येणार वाहतूक सिग्नल !

रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी : म्हापसा पालिकेचा ओम साई क्रिएशन्स कंपनीशी करार

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : येथील नगरपालिकेला अखेर शहरात ट्रॅफिक सिग्नल बसविण्याचा मुहूर्त सापडला असून मागील अनेक महिन्यांपासून रेंगाळलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या वाटेवर आहे. पालिकेने ओम साई क्रिएशन्स या कंपनीकडे ट्रॅफिक सिग्नल बसवण्याचा करार गुरुवारी (ता.३०) केला. या करारानुसार, म्हापशात एकूण ५ मोक्याच्या ठिकाणी ही सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे.

शहरात सिग्नल यंत्रणा नसल्याने बरीच टीका पालिकेवर केली जात होती. सिग्नलअभावी वाहतुकीवर ताण पडायचा, तसेच लोकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागायचा. त्यामुळेच सिग्नल बसवण्यात यावे, यासाठी अनेक प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडून म्हापसा पालिकेला पाठवण्यात आले होते. मात्र, प्रत्येकवेळी याकडे दुर्लक्ष झाले.

मार्चच्या आरंभी म्हापसा पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत हा सिग्नलचा मुद्दा उपस्थित झालेला. त्यावेळी सिग्नल मार्चच्या अखेरीस बसवले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांनी सांगितले की, ओम साई क्रिएशन्सकडे पालिकेने सिग्नल यंत्रणेसाठी करार केला. सदर करार गेल्या आठवड्यात होणार होता, पण तांत्रिक बाबीमुळे त्यास विलंब झाला. येत्या १५ दिवसांत सिग्नल कार्यान्वित केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

करासवाडा जंक्शनसह पाच जागा निश्‍चित !

शहरात ५ ठिकाणी ही ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे,अशी माहिती नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी दिली. यात करासवाडा जंक्शन, पालिकेसमोरील न्यायालयीन जंक्शन, बस स्थानकाजवळील गांधी सर्कल, बस स्थानकाशेजारील स्वार आस्थापनासमोरील रस्ता व हळदोणा टॅक्सी स्थानकलगत जंक्शनवर सिग्नल असेल.

वीज बिल न भरल्याने बंद

कोर्ट जंक्शनजवळील यंत्रणा गेल्या १० महिन्यापासून वीज बिल न भरल्याने बंद पडली होती. त्यानंतर सदर ठिकाणी सिग्नल बसवण्याचे काम दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवले होते. पण त्यांनी सिग्नल बसवल्यानंतर ती कार्यान्वित न केल्याने काही महिन्यापासून ती बंद होती. शेवटी पालिकेने ओम साई क्रिएशन्सकडे करार करून सिग्नल बसवण्यासाठी पावले उचलली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: पाकिस्तानी अंपायरचा तो 'अजब' निर्णय! ऑस्ट्रेलियन खेळाडूही चक्रावले, नेटकरी म्हणाले, "अशा अडाणी लोकांना अंपायर कोणी केलं?"

Video: "हटो हटो, डोन्ट डिस्टर्ब चेट्टा"! कॅप्टन सूर्याचा धमाल व्हिडीओ; नेटवर घालतोय धुमाकूळ

Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

Kurdi: 1882 साली सोमेश्वराची घटना पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे! साळावली धरणाच्या जलाशयाखाली बुडालेले 'कुर्डी' गाव

Bengaluru Airport Bomb Threat: "माझ्याकडे दोन बॉम्ब आहेत", बंगळुरु विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा; इंडिगो प्रवाशाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT