Mapusa bus stand
Mapusa bus stand Dainik Gomantak
गोवा

म्हापसा बसस्थानक की कचरास्थानक? साफसफाईकडे पालिकेचं दुर्लक्ष

दैनिक गोमन्तक

म्हापसा : म्हापसा बसस्थानकावर खुद्द शासकीय यंत्रणांकडूनच कमालीचा बेशिस्तपणा आणि निष्काळजीपणा होत असल्याने हे बसस्थानक की कचरास्थानक, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थानकाच्या आवारात नियमितपणे झाटलोट करण्याबाबत सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच दुसऱ्या बाजूने कचराकुंडीत (Garbage) टाकलेला कचरा उचलून नेण्यास पालिकेचे कर्मचारीही टाळाटाळ करीत आहेत.

बसस्थानकाच्या कामकाजासंदर्भात शासकीय पातळीवर अनागोंदी चालल्याच्या तक्रारी आल्यानंतर उत्तर गोवा (goa) जिल्हा रस्ता सुरक्षा नियंत्रण विभागाच्या निर्णयानुसार दोन-तीन महिन्यांपूर्वी विविध शासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांनी या स्थानकाची संयुक्त पाहणी केली होती. परंतु त्याचा परिणाम शून्यच निघाला हे स्पष्ट झाले आहे, असे यासंदर्भात बोलताना ‘गोवा कॅन’चे रोलंड मार्टिन्स यांनी सांगितले.

प्रवाशांच्या, संबंधित लोकांच्या सुरक्षिततेसंदर्भात तसेच साफसफाईबाबत शासकीय पातळीवरून कोणती उपाययोजना करण्‍यात आली याचे पर्यवेक्षण करण्याच्या हेतूने ती पाहणी करण्यात आली होती. म्हापसा (Mapusa) हे उत्तर गोवा पातळीवरील सर्वाधिक मोठे बसस्थानक आहे. असे असतानाही सुमारे दोन वर्षांपूर्वी अर्थांत जानेवारी 2020 मध्ये केलेल्या पाहणीसंदर्भात कोणताच पाठपुरावा आणि कार्यवाही करण्यात आली नाही, असे दिसून येते.

तीन महिन्यांपूर्वी केलेल्या अशाच एका पाहणीवेळी कदंब वाहतूक महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी विष्णू शेटगावकर, म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्रांव व रूपेश सामंत, म्हापसा नगरापलिकेचे अभियंता नदीम शेख, वाहतूक खात्याचे अधिकारी पवन शेट व प्रवीण वाडकर, म्हापसा येथील नागरी आरोग्य केंद्राचे निरीक्षक उदय ताम्हणकर आणि चार्लस्‌ कुरैय्‍या फाउंडेशनचे ताहीर नरोन्हा यांचा समावेश होता. असे असूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

अधिकाऱ्यांची पाहणी कशासाठी?

वेळोवेळी केलेल्या पाहणीवेळी विविध शासकीय खात्यांचे ज्येष्ठ अधिकारी तसेच ग्राहक मंचच्या स्वयंसेवकांची उपस्थिती होती. असे असतानाही कचरा सर्वत्रच पसरलेला असतो. त्यामुळे शासकीय पाहण्यांचा परिणाम शून्यच झाला आहे. वारंवार चकरा मारूनही सरकारी अधिकाऱ्यांना ही समस्‍या सोडविता येत नसेल तर त्‍यांनी आता या बाजूला फिरकूच नये, अशा संतप्‍त प्रतिक्रिया लोकांमधून व्‍यक्त होऊ लागल्‍या आहेत.

दोन-तीन महिन्यांपूर्वी विविध शासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांनी म्‍हापसा बसस्थानकाची संयुक्त पाहणी केली. परंतु त्याचा परिणाम शून्यच निघाला. अजूनपर्यंत त्‍यांना कचरा समस्‍येवर तोडगा काढता आलेला नाही. उलट ही समस्‍या आता उग्र बनत चालली आहे. अस मत रोलंड मार्टिन्स यांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

SCROLL FOR NEXT