Goa ATM Theft, Mapusa Atm Theft Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: हातचलाखीने बदलले ATM कार्ड, 3 महिलांचे 1 लाख रुपये पळवले; हरियाणातील संशयितांना अटक

Mapusa ATM Theft: पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीचा हा प्रकार २६ जून रोजी घडला होता. संशयितांनी म्हापसा मार्केट परिसरातील एका एटीएम काउंटरमध्ये तिघा पीडितांचे पैसे चोरले होते.

Sameer Panditrao

म्हापसा: एटीएम कार्ड चोरून त्याआधारे संबंधिताच्या बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या दोघा संशयितांना म्हापसा पोलिसांनी अटक केली असून त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये सोनू कुमार (३२) व संजय महेस्वल (३३) या हरियाणामधील चोरट्यांचा सहभाग आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीचा हा प्रकार २६ जून रोजी घडला होता. संशयितांनी म्हापसा मार्केट परिसरातील एका एटीएम काउंटरमध्ये तिघा पीडितांचे पैसे चोरले होते. या संशयितांनी पीडितांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलले.

नंतर पीडितांच्या कार्डच्या आधारे संबंधितांच्या बँक खात्यातून अनेकवेळा पैसे चोरले. तिघा पीडितांचे मिळून १,४१,५०० रुपयांवर चोरांनी डल्ला मारला होता. फसवणूक केलेले बार्देशमधील असून त्यात एका महिलेचा समावेश आहे.

दरम्यान, या चोरांना अलीकडेच डिचोली पोलिसांनी अशाच गुन्ह्यात अटक केली होती. त्यानुसार म्हापसा पोलिसांनी आपल्या हद्दीतील वरील चोरीप्रकरणी या संशयितांना ट्रान्झिट रिमांडवर ताब्यात घेत रितसर अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताच्या बाजारपेठेत महागड्या अमेरिकी वस्तूंना गिऱ्हाईक नाही, रशिया-चीनचा माल ठरतोय हिट

Russian Oil Imports: "अमेरिकेच्या दबावाखाली झुकणार नाही" रशियन तेलाच्या खरेदीवर भारताचे ठाम उत्तर

रस्ते झाले मस्त, मरण झाले स्वस्त! वाढत्या अपघातांना जबाबदार कोण?

PM Kisan 20th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; असा तपासा बॅलन्स

न्‍यायालयांत 60,354 प्रकरणे प्रलंबित, राज्यात 15,392 प्रकरणांवर पाच वर्षांहून अधिक काळ निर्णय नाही

SCROLL FOR NEXT