Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Road Issue: पावसाळा तोंडावर मात्र रस्त्यांची स्थिती जैसे थे; म्हापशात रस्त्यांना वालीच नाही!

खोदकामांमुळे अपघात वाढले

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Road Issue: म्हापसा येथील भूमिगत वीजवाहिन्‍या टाकण्याच्या कामामुळे म्हापशातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे.

राज्यात पावसाळा सुरू होण्यास थोडासा विलंब होऊनही संबंधित अधिकारी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात अपयशी ठरले आहेत.

भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदलेले अनेक प्रमुख रस्ते हे दगड आणि मातीच्‍या ढिगाऱ्यांनी पुन्हा भरले आहेत. मात्र, पावसाळ्यापूर्वी सदर रस्‍त्‍यांचे डांबरीकरण न केल्यास त्‍यावर खड्डे पडू शकतात आणि वाहनचालक, पादचाऱ्यांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

मध्यंतरी, हे रस्ते शहरातील सिवरेज लाईन टाकण्यासाठी खोदले गेले होते. त्यावेळी रहिवाशांना मोठी गैरसोयींचा सामना करावा लागला होता. या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष न दिल्याने नागरिक सध्‍या नगरसेरक व स्थानिक आमदारावर नाराजी व्‍यक्त करीत आहेत.

दरम्‍यान, सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, रस्त्यांच्या दुरुस्तीची निविदा निघाली आहे. मात्र फाईल स्वीकृती स्तरावर प्रलंबित आहे.

निविदा निघाली असली तरी वर्कऑर्डर जारी झालेली नाही. मात्र आम्ही कंत्राटदाराला काम सुरू करण्यास सांगितले आहे. कारण पाऊस सुरू झाला तर आम्ही काम करू शकणार नाही.

स्थानिक आमदार व साबांखाच्या अभियंत्यांची बैठक घेऊन रस्‍त्‍यांच्‍या समस्‍येवर मार्ग काढला जाईल. रस्‍तादुरुस्तीचे काम सुरू करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी आम्ही या दोन दिवसांत बैठक घेऊ.

- प्रिया मिशाळ, म्हापसा नगराध्यक्षा

आपल्या प्रभागात भूमिगत केबल टाकण्याचे काम महिनाभरापूर्वी पूर्ण झाले असले तरी अद्यापही रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही. त्‍यामुळे अपघात वाढले आहेत. पावसाळ्यात परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते.

- डॉ. नूतन बिचोलकर, नगरसेविका

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण केले नाही तर म्हापसेकरांना येणारे दिवस खूप त्रासदायक ठरतील. मुळात स्थानिक प्रशासन व आमदाराने रस्त्यांच्‍या दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेतले पाहिजे.

- नारायण राठवड, स्थानिक रहिवासी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू अखेर पोलिसांच्या ताब्यात! मोपा विमानतळावरून थेट वैद्यकीय तपासणीसाठी

SCROLL FOR NEXT