Goa EDM 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa EDM: गोव्यात एकाचवेळी अनेक महोत्सव; स्थानिकांवर संक्रांत

दैनिक गोमन्तक

Goa EDM: गोव्यात डिसेंबरमध्येच ‘सनबर्न’पाठोपाठ आणखी किमान तीन ईडीएम (इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक) होऊ घातले असून उत्तर गोव्याच्या किनारपट्टी भागात यावर्षी स्थानिकांची झोप अक्षरशः उडणार आहे.

उच्च न्यायालयाने कडक निर्देश देऊनही या महोत्सवांवर नियंत्रण ठेवण्याची सरकारची मानसिकता दिसत नाही; कारण समाजमाध्यमांवर या आयोजकांनी जोरात तिकीट विक्री चालवूनही सरकारने त्याची गंभीरपणे दखल घेतलेली नाही.

सूत्रांच्या मते, ‘सनबर्न’लाही यावर्षी फारशा मान्यता मिळालेल्या नाहीत; परंतु मान्यता नसतानाही त्यांनी हणजूण येथे पायाभूत सुविधा उभारण्यास सुरुवात केली असून इतर महोत्सवांबाबतही तीच परिस्थिती आहे.

सनबर्न महोत्सवाला प्रतिवर्षी ५० ते ८० हजार प्रेक्षक उपस्थित असतात व ६५ डेसिबल्सची ध्वनिमर्यादा असतानाही तेथे १२० डेसिबल्सपेक्षा अधिक क्षमतेची ध्वनियंत्रणा अस्तित्वात असते. इतरही ठिकाणी ध्वनिविषयक नियमांचे उल्लंघन नेहमीचेच झाले आहे. शिवाय अमली पदार्थांचे सेवन हा नित्याचाच आरोप आहे. त्यातून तेथे काही मृत्यूही घडलेले आहेत.

‘कर्कष संगीत वाजविल्याशिवाय महोत्सवात सहभागी होणाऱ्यांना ‘किक’ येत नाही’, असे तेथे सहभागी होणाऱ्यांचे म्हणणे असते.

या महोत्सवांना विदेशी ‘डिजे’ उपस्थित असतात, जे करोडो रुपये शुल्क घेतात; परंतु त्यांना त्यासाठी देशी परवाना नसतो. या महोत्सवांसाठी वापरली जाणारी ध्वनियंत्रणा व इतर पायाभूत सुविधा गोव्याबाहेरून आयात होते. त्यामुळे या महोत्सवांचा तसा गोव्याला फायदा कमीच आहे. किनारपट्टीवर व्यवसाय करणाऱ्या एका गोमंतकीय हॉटेलचालकाच्या मते, आम्ही सर्व कर भरून राज्याचे नियम पाळतो; परंतु बाहेरचे संगीत संयोजक येथे येऊन नियम आणि कायदे धाब्यावर बसवतात.

त्यांच्यावर न्यायालय सतत डाफरत असले, तरी सरकारला या वारंवार होणाऱ्या उल्लंघनाची फिकीर नसते. शिवाय मोठ्या प्रेक्षकवर्गामुळे हणजूण व उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात वाहतुकीची कोंडी होते. स्थानिकांना त्याचीही अडचण सोसावी लागते. दुर्दैवाने या महोत्सवांच्या आयोजनात खूप मोठा निधी गुंतवलेला असतो. त्यामुळे वेळप्रसंगी स्थानिक नेते आणि सरकारही बोटचेपी भूमिका घेते, असा आरोप आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT