Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism : पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी: श्रीपाद नाईक

Goa Tourism : पांचजन्य सागर मंथन संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism : सासष्टी, पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कृषी, वन, जलक्रीडा, हॉटेलसारख्या क्षेत्रात या संधी उपलब्ध आहेत.

या क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करून अनेक नोकऱ्यासुद्धा उपलब्ध असल्याचे केंद्रीय राज्य पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पांचजन्य सागर मंथन संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

देशात अनेक ठिकाणी धार्मिक व पर्यटन स्थळांचा विकास केला जात आहे व केंद्र सरकार त्या कामासाठी आर्थिक मदत देत असते असे सांगून नाईक पुढे म्हणाले, की पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याचा विचार सरकार करीत आहे. युवकांना पर्यटनामध्ये आपले करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

लोकांची सेवा करणे हेच सुशासन असल्याचे त्यांनी आणखी एका प्रश्र्नाला उत्तर देताना सांगितले. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत सरकारच्या सर्व योजना आणि लाभ पोहोचणे हीच लोकांची सेवा आहे.

ब्रिटिशांनी जे कायदे केले ते लोकांना सतावणारे होते, पण आता सरकारने काही कायद्यांमध्ये बदल केले आहेत, जे लोकांच्या हिताचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT