Manoj Parab vs Viresh Borkar Dainik Gomantak
गोवा

Manoj Parab vs Viresh Borkar: "सांत आंद्रेत जाऊन बोरकरांना उघडे पाडू"; मनोज परब यांची आरजीमध्ये जोरदार एन्ट्री; ‘सेटिंगबाज’च्या आरोपावरुन हल्लाबोल

manoj parab rejoins rg party: मनोज परब ‘सेटिंगबाज’ असल्याचा आरोप आमदार वीरेश बोरकर यांनी समाज माध्यमांवर केल्यानंतर सायंकाळी ‘आरजी’मध्ये पुन्हा प्रवेश केल्यावर मनोज परब यांनी वीरेश यांचे आरोप खोडून काढले. सांत आंद्रेत जाऊन बोरकरांना उघडे पाडू, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: मनोज परब ‘सेटिंगबाज’ असल्याचा आरोप आमदार वीरेश बोरकर यांनी समाज माध्यमांवर केल्यानंतर सायंकाळी ‘आरजी’मध्ये पुन्हा प्रवेश केल्यावर मनोज परब यांनी वीरेश यांचे आरोप खोडून काढले. सांत आंद्रेत जाऊन बोरकरांना उघडे पाडू, असेही ते म्हणाले.

‘‘रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाची (आरजी) स्‍थापना मी केली आहे. त्‍यामुळे हा पक्ष इतर कोणाच्‍याही ताब्‍यात जाऊ देणार नाही’’, असे ठणकावून सांगत ‘‘आमदार वीरेश बोरकर यांना सांत आंद्रेत जाऊन उघडे पाडू’’, असा इशारा आज पुन्‍हा पक्षात प्रवेश केलेल्‍या मनोज परब (Manoj Parab) यांनी दिला.

मे महिन्‍यात ‘आरजी’च्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा देत राजकीय संन्‍यास जाहीर केलेल्‍या परब यांच्‍या पक्ष प्रवेशासाठी पर्वरीतील गाडगे महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमाला आरजीच्‍या कार्यकर्त्यांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. पक्षात पुन्‍हा प्रवेश केल्‍यानंतर परब यांनी आमदार बोरकर यांच्‍यावर कठोर टीका केली. ‘‘आरजीच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा देण्‍याआधी माझ्याविरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्‍यात आला. मी पक्षाला हानिकारक असल्‍याचा दावा करीत अध्‍यक्षपदाचा राजीनामा देण्‍याची अप्रत्‍यक्ष मागणी माझ्‍याकडे केली. त्‍यामुळे मी पक्षाच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला’’, असे परब म्‍हणाले.

‘‘२०२२ ची विधानसभा निवडणूक आम्‍ही केवळ जिद्द आणि सोशल मीडियाच्‍या बळावर लढविली. त्‍यात वीरेश बोरकर यांच्‍या रूपाने एक आमदारही निवडून आणला. वीरेश बोरकर यांना आमदार करण्‍यापासून ते नंतर विधानसभेतील भाषणे लिहून देण्‍याचे काम आम्‍ही केले. परंतु, बोरकर यांना त्‍याचा विसर पडला. भंडारी आणि मराठा समाजाचे राजकारण करीत त्‍यांनी मला राजीनामा देण्‍यास भाग पाडले. परंतु, मी डगमगलो नाही. मी पक्ष निर्माण करू शकतो, तसेच पक्षाला पुन्‍हा उर्जितावस्‍था देऊन येत्‍या विधानसभा निवडणुकीतही आमदार निवडून आणू शकतो’’, असे परब म्हणाले.

बोरकरांनी रचले माझ्याविरुद्ध कुभांड

१.‘‘२०२२ च्‍या विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’चे अधिकाधिक आमदार निवडून यावेत, हीच माझी इच्‍छा होती. त्‍यामुळे मी थिवीपेक्षा इतर मतदारसंघांत जाऊन प्रचार केला. थिवीत मी केवळ १५ दिवस प्रचार केला. तरीही माझ्‍यावर स्‍वार्थी असल्‍याचे बिनबुडाचे आरोप केले, असे परब म्हणाले.

२. उच्चशिक्षित आणि लाखो रुपये पगाराची नोकरी मिळत असतानाही गोवा आणि गोमंतकीय जनतेच्‍या हितासाठी मी ‘आरजी’ची स्‍थापना केली. तरीही बोरकर यांनी माझ्‍याविरोधात कुभांड रचले. त्‍यामुळे लवकरच सांत आंद्रेत जाऊन तेथील जनतेसमोर बोरकर यांना उघडे पाडणार’’, असेही परब यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Daily Horoscope: रवी योग आणि भरणी नक्षत्राची साथ ठरणार लाभदायक! 'या' राशींसाठी सोमवार अत्यंत खास; कामाच्या वेगासोबत विचारांचा समतोल साधा

Shadashtak Yog 2026: सूर्य-चंद्राचा अशुभ योग! 'या' 3 राशींच्या नोकरी-व्यवसायात वाढणार अडचणी; आर्थिक नियोजन कोलमडणार?

Canada Shooting: कॅनडात रक्तरंजित थरार! शॉपिंग स्टोअरबाहेर भारतीय वंशाच्या जोडप्याची हत्या; परदेशात भारतीयांवर हल्ल्यांचे सत्र सुरुच

Maharashtrian Shepu Bhaji: शेपू आवडतो की नावडतो? या भाजीच्या प्रेमात पडाल, अशी आहे चवीची भन्नाट कहाणी

Gossip Culture: गॉसिप्स अर्थात रिकामटेकड्यांच्या उचापती; गोड बोलून गुपिते काढणाऱ्यांपासून सावध राहा!

SCROLL FOR NEXT